News Flash

उपनगरीय रेल्वेला महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या १,६०० जवानांचे बळ?

पश्चिम रेल्वेचाही ५८८ जवानांचा प्रस्ताव

पश्चिम रेल्वेचाही ५८८ जवानांचा प्रस्ताव

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सुरक्षेसाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या जवान तैनात करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. लोहमार्ग पोलीस, मध्य रेल्वे सुरक्षा दलाने स्वतंत्र प्रस्ताव तयार केला असतानाच आता पश्चिम रेल्वेनेही ५८८ जवान तैनातीचा प्रस्ताव बनविल्याचे रेल्वे सुरक्षा दलातील सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण १,६७३ जवान उपनगरीय रेल्वेच्या सुरक्षेसाठी मिळतील.

मुंबई उपनगरीय रेल्वेचा पसारा पाहिल्यास मध्य, पश्चिम रेल्वेवर २०० पेक्षा जास्त लोकल धावतात आणि दिवसाला तीन हजारपेक्षा अधिक  फेऱ्या होत आहेत. रेल्वेच्या मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी ही लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलावर आहे. परंतु सध्याची प्रवासी संख्या आणि पोलिसांचे मनुष्यबळ पाहता ते अपुरे पडत आहे. नुकत्याच एल्फिन्स्टन रोड स्थानकात झालेल्या दुर्घटनेनंतर सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आणि लोहमार्ग पोलिसांबरोबरच रेल्वे सुरक्षा दलाने कमी मनुष्यबळामुळे कामावर पडणारा ताण पाहता जादा मनुष्यबळासाठी प्रयत्न सुरू केले. लोहमार्ग पोलिसांनी ८३५, मध्य रेल्वे सुरक्षा दलाने २५० महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे जवान मिळवण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला. यांनतर आता पश्चिम रेल्वेनेही ५८८ जवानांचा प्रस्ताव तयार केला आहे. तिन्ही प्रस्ताव मंजूर झाल्यास १,६७३ जवान मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सुरक्षेसाठी मिळतील. लोहमार्ग पोलिसांना सुरक्षा मंडळाचे जवान उपलब्ध झाल्यास त्या सर्वाची नियुक्ती महिला डब्यात करण्याचे नियोजन केले आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 1:50 am

Web Title: maharashtra security board in mumbai railway
Next Stories
1 ‘व्हिवा लाऊंज’मध्ये पूनम महाजन यांच्याशी गप्पा
2 करी रोड पादचारी पुलाचा मार्ग बदलणार
3 ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर नाटय़कलेचे मर्म उलगडणार!
Just Now!
X