नाना पटोले यांची मागणी

मुंबई : पेगॅससच्या माध्यमातून करण्यात आलेल्या हेरगिरीच्या चौकशीसाठी पश्चिम बंगाल सरकारने नियुक्त के लेल्या चौकशी समितीच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी के ली आहे.

पेगॅससच्या माध्यमातून महत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्याचे काम २०१७ सालापासून होत असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील तत्कालीन  देवेंद्र फडणवीस सरकारनेही माझ्यासह इतर विविध पक्षांतील राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग केले होते. माझा फोन नंबर व नाव मात्र अमजदखान ठेवून अमली पदार्थाच्या व्यापाराशी संबंध जोडून फोन टॅपिंग करण्यात आले होते. हा मुद्दा विधानसभेतही उपस्थित केला होता, त्याची चौकशी होत आहे परंतु विषयाचे गांभीर्य पाहता राज्यात फडणवीस सरकारच्या काळात झालेले फोन टॅपिंग व पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून केलेली हेरगिरी यांचा काही संबंध आहे का, राज्यात केलेले फोन टॅपिंग याच षड्यंत्राचा भाग आहे का, या सॉफ्टवेअरचा राज्यात वापर केला आहे का, ते कोणाकडून आले होते, हे व असे अनेक पश्न अनुत्तरित आहेत. पश्चिम बंगाल सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही सेवानिवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती नेमली तर सत्य बाहेर येईल, असे मत पटोले यांनी व्यक्त केले आहे.

राज्यपालांवर टीका

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केंद्र सरकारने परत बोलवावे, अशी मागणीही पटोले यांनी के ली आहे. नेहरू यांचा द्वेष करणारे संस्कार राष्ट्रीय स्वंयसेवक संघात शिकविले जातात व तो नेहरूद्वेष कोश्यारी यांच्या विधानातून व्यक्त झाला. राज्यपाल म्हणून जी कार्य करायची सोडून इतर कार्यातच ते जास्त रस घेतात, अशी टीकाही पटोले यांनी के ली आहे. कोश्यारी यांनी राजभवनचे रूपांतर हे भाजप कार्यालयात के ल्याचा आरोपही पटोले यांनी के ला.