News Flash

महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना भाजपाच्या सांगण्यावरूनच: राणे

राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार नसल्याचे नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपाने मला जाहीरनामा समितीत घेतले, त्याला मी आता काय करू असा सवाल करत मी माझ्या पक्षाचाही जाहीरनामा काढणार असल्याचे नारायण राणे म्हणाले.

भाजपाने मला खासदार केले. पण त्यांनी मला दिलेले शब्द पाळले नाहीत. मी त्यांना नाव ठेवणार नाही आणि युती झाली म्हणून मी राजीनामा का द्यावा असा सवाल करत मी भाजपाचा सदस्य नाही. त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच नाही. उलट माझ्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना त्यांच्या सांगण्यामुळेच झाली असल्याचे वक्तव्य राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी केले आहे.

हेही वाचा..जनता नव्हेतर ‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी युती, नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार

युती झाल्यामुळे तुम्ही खासदारकीचा राजीनामा देणार का असा सवाल पत्रकारांनी त्यांनी केला होता. यावर त्यांनी राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले.

भाजपाने मला जाहीरनामा समितीत घेतले, त्याला मी आता काय करू असा सवाल करत मी माझ्या पक्षाचाही जाहीरनामा काढणार आहे. एकच माणूस दोन ठिकाणी जाहीरनामा कसा काढेन. त्यावेळी मी त्यांनी हे शक्य नसल्याचे पत्र पाठवेन असे ते म्हणाले.

हेही वाचा..उद्धव ठाकरे म्हणजे दिलेला शब्द न पाळणारा माणूस: नारायण राणे

नितेश राणे काँग्रेसचे आमदार आहेत. ते स्वाभिमान पक्षात सहभागी होतील असे त्यांनी सांगितले. माझा पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढवणार आहे. मग तो मराठवाडा असो की विदर्भ. लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेत मी लढणार की नाही ते ठरवणार आहे. महाआघाडीत जाण्याचा विचार नाही. पाठिंबा दिला म्हणजे महाआघाडीत जाणे होत नाही. तटकरेंना पाठिंबा दिला तेव्हा मी राष्ट्रवादीत गेलो असे झाले नव्हते, असेही राणे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2019 2:12 pm

Web Title: maharashtra swabhimani party establish from the connivance of the bjp says narayan rane
Next Stories
1 अमेरिकेत शिवरायांचा जयजयकार
2 उद्धव ठाकरे म्हणजे दिलेला शब्द न पाळणारा माणूस: नारायण राणे
3 जनता नव्हेतर ‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी युती, नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार
Just Now!
X