पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महाराष्ट्र राज्य पुन्हा एकदा अव्वल ठरले आहे. गेल्या चार वर्षांत राज्यात मुंबई- पुणे समृद्दी महामार्ग, हायब्रीड अ‍ॅन्युटी रस्ते प्रकल्प, मुंबई,नागपूर, पुणे मेट्रो प्रकल्पासारख्या एक लाख ४३ हजार ७३६ कोटी रूपये खर्चाच्या तब्बल २८४ पायाभूत सुविधा प्रकल्पाना मंजूरी मिळाली असून त्यातील बहुतांश प्रकल्पांची कामे सुरू झाली आहेत.

केंद्र शासनाच्या आर्थिक व्यवहार विभागाने देशातील पायाभूत  सुविधा प्रकल्पांची ३१ मार्च २०१८ अखेर पर्यंतची माहिती जाहीर केली आहे. या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये पाच ते ५० कोटीहून अधिक शासकीय पायाभूत सुविधा प्रकल्प,सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प, सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प व शासकीय पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे.

Increase in ST accidents 3 thousand 121 accidents in two months
‘एसटी’चे अपघात वाढले! यंदा केवळ दोन महिन्यातच तब्बल ३ हजार १२१…
Sanjay Raut
मराठी माणूस व एकीकरण समितीत फूट पाडण्याचे भाजपचे कारस्थान – संजय राऊत
Who Are Bjp 23 Candidates in maharashtra ?
Lok Sabha: महाराष्ट्रात भाजपाचे २३ उमेदवार जाहीर, पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट, कुणाला मिळालं तिकिट ?
mudda maharashtracha indian center for policy and leadership development survey about New problems and demands of western Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… पश्चिम महाराष्ट्र : आहे मनोहर तरी…

केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सन १९९०पासून म्हणजेच  गेल्या २८ वर्षांत देशात ५४ लाख ६५ हजार कोटी किमतीचे ९०६८ पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले. या काळात राज्यात ६ लाख १९ हजार कोटींचे ११४४ पायाभूत सुविधा प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली असून महाराष्ट्र पायाभूत सुविधा निर्माण करण्यात अव्वल ठरले आहे. तर असून उत्तरप्रदेश दुसऱ्य़ा स्थानावर असून तेथे ३ लाख ४३ हजार कोटींचे ५४४ प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. गोवा हे राज्य पायाभूत सुविधा निर्माण करण्यात तिसऱ्य़ा स्थानावर असून या राज्यात ३ लाख २५ हजार कोटी किमतीचे ४६ प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. अरुणाचल प्रदेश चौथ्या स्थानावर तर आंध्र प्रदेश क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे.

सन २०१४ ते २०१८ या पाच वर्षांत १ लाख ४३ हजार ७३६ कोटी किंमतीचे २८४  प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये सन २०१४—१५ या वर्षांत २१ हजार ५७९ कोटी ९१ लाख किमतीचे ९८ प्रकल्प हाती घेण्यात आले. तर सन २०१५—१६ या वर्षांत ३२ हजार ९७६ कोटी ७३ लाख रुपयांचे ८२ प्रकल्पाना मान्यता देण्यात आली असून  सन २०१६—१७ या आर्थिक वर्षांत ६० हजार २७० कोटी ७१ लाख किमतीचे ८२ प्रकल्प तर २०१७—१८ या वर्षांत २८ हजार ९०९ कोटी रुपयांचे ४१ पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई, पुणे, नागपूर, नवी मुंबईतील मेट्रो प्रकल्प, नवी मुंबईतील विमानतळ तसेच रस्ते प्रकल्पांचा समावेश आहे.  देशात गेल्या चार वर्षांत १५ लाख ८२ हजार कोटी रूपये खर्चाच्या तीन हजार ४७० पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली. यामध्ये इतर राज्यांचा तुलनेत सर्वाधिक १ लाख ४३ हजार ७३६ कोटी किमतीचे २८४ प्रकल्प हे महाराष्ट्रातील आहेत. गेल्या २८ वर्षांत सरासरी वर्षांला ४० पायाभूत सुविधा प्रकल्प राज्यात हाती घेण्यात येत होते, या तुलनेत गेल्या चार वर्षांत प्रतिवर्षं ७१ पायाभूत सुविधा प्रकल्प महाराष्ट्रात राबविण्यात येत असल्याचेही या पाहणीत म्हटले आहे.