मुंबई : बीड येथील महिला पोलीस शिपाई ललिता साळवे यांना राज्य पोलीस मुख्यालयाने लिंगबदलासाठी परवानगी दिली. मुख्यालयाने धाडलेले पत्र रविवारी साळवे यांच्या हाती पडले. त्यानुसार पुढील उपचारांसाठी त्यांनी सोमवारी मुंबईतील जेजे रुग्णालय गाठले.साळवे यांनी लिंगबदलाची इच्छा व्यक्त केली होती. त्यास परवानगी देण्यात आल्याचे बीडचे पोलीस अधिक्षक श्रीधर गोविंदराजन यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. मात्र लिंगबदलानंतर त्यांना पुरुष शिपाई म्हणून पोलीस दलात सामावून घेतले जाईल का, याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मी या दिवसाचीच वाट पाहात होते, आत मी माझी स्वप्न पूर्ण करू शकेन, या शब्दांत साळवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

mumbai municipal corporation, transparent administration
मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शी होणार? नागरिकांशी संवाद, संपर्क वाढविण्याचे मनपा आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आवाहन
High Court orders Municipal Corporation to remove illegal vendors from Hill Road
मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
employee in nagpur get bomb threat call to nse bse buildings
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपुरातील कर्मचाऱ्याला फोन
indusInd bank officials arrested
बनावट शेअर ट्रेडिंग घोटाळा: इंडसइंड बँकेच्या अधिकाऱ्यांना अटक; सायबर पोलीस ठाण्याची कारवाई