पालिकेच्या १० टक्केकराचा सभासदांवर भार

fir against power company team over extortion money
मीटरमध्ये गडबडीच्या नावावर विद्युत महामंडळाचा अभियंताच मागत होता लाच….अखेर पाठलाग करून….
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
jayant patil praful patel
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”, पटेलांच्या दाव्यावर जयंत पाटील म्हणाले, “त्यांना पक्षसंघटना…”
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी

मुंबई महापालिकेने आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू घडवण्यासाठी शिवाजी पार्क येथे उभारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महात्मा गांधी जलतरण तलावाचे सदस्य शुल्क दरवर्षी १० टक्क्य़ांनी वाढून आजघडीला सहा हजार रुपयांवर पोहोचले आहे. आता रात्री केवळ एक तास जलतरणासाठी इच्छुक असलेल्यांसाठी पावणेदहा हजार रुपये शुल्क घेऊन प्रवेश सुरू करण्यात आले आहेत. मात्र, हळूहळू सरसकट सर्वच सभासदांचे शुल्क पावणेदहा हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा घाट पालिकेने घातला आहे. या शुल्कवाढीमुळे महात्मा गांधी जलतरण तलाव सर्वसामान्य नागरिकांना परवडेनासा होऊ लागला असून हळूहळू तो धनदांडग्यांच्या हाती जाण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

या जलतरण तलावाचे नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेने मोठय़ा धूमधडाक्यात या जलतरण तलावाचे लोकार्पण केले. त्यावेळी प्रतिवर्ष सभासद शुल्क २५०० रुपयांच्या आसपास होते. मात्र सुविधांचा अभाव आणि दर वर्षी १० टक्क्यांनी वाढणारे शुल्क यांमुळे हा जलतरण तलाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागला आहे.

खातेप्रमुखाच्या मंजुरीने दर वर्षी शुल्कामध्ये १० टक्के वाढ करता येऊ शकेल, अशा आशयाचे एक परिपत्रक पालिकेच्या मुख्य लेखापालांनी जारी केले आहे. त्याचा आधार घेत तलावाचे शुल्क दरवर्षी वाढवण्यात येत आहे. त्यामुळे सध्या सर्वसाधारण सभासदांचे शुल्क ६१३० रुपयांवर पोहोचले आहे, तर ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी वर्षांकाठी ४१०० रुपये शुल्क आकारणी करण्यात येत आहे.

हा भेदभाव कशाला?

जलतरण तलावाची वेळ रात्री वाढवावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्याची दखल घेत रात्री ८.१५ ते रात्री ९.१५ या एक तासाच्या वेळेत विशेष सदस्य शुल्क घेऊन नागरिकांना जलतरणाची संधी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या विशेष वेळेसाठी ९७६० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. परंतु, गेले अनेक दिवस प्रतीक्षा करूनही प्रवेश न मिळाल्याने ६०० जणांनी वाढीव शुल्क भरून जलतरण तलावाचे सभासदत्व घेतले आहे. या सभासदांना रात्री एक तासाच्या विशेष वेळेत आणि दिवसभरात कधीही जलतरणाचा आनंद लुटता येणार आहे. मात्र ६१३० रुपये शुल्क भरणाऱ्या जुन्या सभासदांना रात्रीच्या विशेष वेळेत जलतरण तलावात पाऊलही टाकता येणार नाही. जलतरण तलावाचे प्रशासन जुन्या आणि नव्या सभासदांमध्ये भेदभाव करीत असून आपल्याला सापत्न वागणूक देण्यात येत असल्याचा जुन्या सभासदांचा आक्षेप आहे.