01 March 2021

News Flash

महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय काहींच्या फारच जिव्हारी लागलेला दिसतो : अजित पवार

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे न्यायालयानं दिले आदेश

फाइल फोटो (फोटो सौजन्य : Twitter/AjitPawarSpeaks वरुन साभार)

मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवण्याचा आदेश देत ठाकरे सरकारला मोठा दणका दिला आहे. उच्च न्यायालयाने जागेच्या हस्तांतरणावरही स्थगिती आणली आहे. यावर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्याबाबत महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय काहींच्या फारच जिव्हारी लागलेला दिसतो. म्हणूनच असा टोकाचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचा आरोप केला.

“कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर न्याय व विधी खाते, अटर्नी जनरल, मुख्यमंत्री एकत्र बसून पुढे काय करायचं हे ठरवतील. काम सुरू करण्यासाठी जे करायचं आहे. त्यावर विचार करून निर्णय होईल, असंही अजित पवार म्हणाले.

आणखी वाचा- उच्च न्यायालयाने कांजूर मेट्रोचं काम थांबवण्याचा आदेश दिल्यानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

विकासकामांमध्ये अडथळा नको

“केंद्र आणि राज्यसरकार असो विकासकामांमध्ये कुणीच राजकारण किंवा अडथळा करु नये. माझ्या अनेक वर्षाच्या राजकीय जीवनात शरद पवार यांची ५०-५५ वर्षाची राजकीय कारकीर्द पाहिलेली आहे. मी ३० वर्ष राजकीय क्षेत्रात काम करत आहे. मी कधीही विकासकामात राजकारण आणलं नाही. उलट मदतच करत असतो,” असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- अहंकार अहंकार आणि अहंकार…; मेट्रो कारशेडवरून शेलारांचा ठाकरे सरकारवर निशाणा

काय म्हटलंय न्यायालयानं?

मुंबई मेट्रो-३ प्रकल्पासाठी कांजूरमार्ग येथील १०२ एकर जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाबाबत उच्च न्यायालयाने सोमवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसेच जिल्हाधिकारी आपला आदेश मागे घेऊन सगळ्या पक्षकारांची नव्यानं सुनावणी घेणार का, की जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायदेशीर प्रक्रियेला अनुसरून नसल्याचा निष्कर्ष देऊन तो आम्ही रद्द करू? अशी विचारणा न्यायालयाने सरकारला केली होती. दरम्यान, त्यानंतर बुधवारी कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालायानं दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 2:37 pm

Web Title: mahavikas aghadi deputy cm ajit pawar criticize opposition leaders on mumbai metro kanjurmarg car shed jud 87
Next Stories
1 “गुडघ्यात मेंदू असलेले सरकार सत्तेवर असले की असे प्रकार घडतात”
2 अहंकार अहंकार आणि अहंकार…; मेट्रो कारशेडवरून शेलारांचा ठाकरे सरकारवर निशाणा
3 मुंबई मेट्रो कारशेड : उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला, म्हणाले…
Just Now!
X