22 November 2019

News Flash

‘फिक्सर’ शुटिंग मारहाण: अभिनेत्री माही गिल क्रू मेंबर्ससह मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी माही गिल आणि इतर क्रू मेंबर्सनी केली आहे

‘फिक्सर’ या वेबसीरिजच्या शुटिंगदरम्यान अभिनेत्री माही गिल आणि तिच्या इतर क्रू मेंबर्सनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. माही गिल आणि इतर सदस्यांना बुधवारी एका टोळक्याने दारू पिऊन मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात पोलिसांनीही या टोळक्याची साथ दिल्याचा आरोप माही गिलने केला होता. दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांनी एक व्हिडिओ ट्विट करत यासंदर्भातली माहिती दिली होती. ज्यानंतर पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतलं.

आता या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी माही गिल आणि तिच्या क्रू मेंबर्सनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान माही गिल आणि इतर क्रू मेंबर्सनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण? 

‘फिक्सर’ या शोचं शुटिंग मीरा रोड या ठिकाणी सुरू होतं. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी अभिनेत्री माही गिल आणि इतर कलाकारांना मारहाण केली आहे. निर्माता साकेत सावनी यांनाही या दरम्यान दुखापत झाली आहे. पोलिसांनीही यावेळी अज्ञात गुंडाची साथ दिल्याचा आरोप माही गिलने केला आहे. साकेत सावनी आणि माही गिल यांचा एक व्हिडिओ दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे ज्यामुळे ही सगळी माहिती समोर आली.

First Published on June 20, 2019 1:52 pm

Web Title: mahi gil and crew members meet cm devendra fadanvis for beating on set issue scj 81
Just Now!
X