भारतातील आघाडीची ट्रॅक्टर उत्पादक आणि २०.७ अब्ज डॉलर्स महिंद्रा समूहाच्या महिंद्रा अँड महिंद्रा फार्म इक्विपमेंट विभागाने आज महिंद्रा समृद्धी इंडिया अग्री पुरस्कार २०१९ चे विजेते जाहीर केले. २०११ मध्ये सुरू झालेले महिंद्रा समृद्धी इंडिया अग्री पुरस्कार भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती क्षेत्रासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या शेतकरी आणि संस्थांना दिला जातो.

निती आयोगाचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमिताभ कांत हे या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. श्री. संजय अगरवाल, सचिव, शेती विभाग, सहकार्य आणि शेती कल्याण, भारत सरकार हे ही या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते. या सोहळ्यात महिंद्राने नाविन्यपूर्णता आणि तंत्रज्ञानावर आधारित शेतीतील नव्या पर्वाशी – फार्मिंग ३.० शी असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली. २०१७ मध्ये लाँच करण्यात आलेले फार्मिंग ३.० शेतीचे आधुनिक तंत्र आणि शेती तंत्रज्ञान समृद्धीसाठी शेती क्षेत्रातील विविध घटकधारकांचे एकत्रित प्रयत्न व सहकार्यावर आधारित आहे. फार्मिंग ३.० च्या मुख्य घटकांमध्ये शेतीची स्मार्ट यंत्रणा, अचूक प्रकारे शेती करणे, डिजिटल व्यासपीठ, गरजेप्रमाणे भर्ती सेवा आणि पर्यावरण यंत्रणेशी नाते जोडणे यांचा समावेश आहे.

महिंद्रा समृद्धी कृषी शिरोमणी सम्मान (जीवनगौरव पुरस्कार) २०१९ डॉ. ई. ए. सिद्द्की यांना त्यांनी भारतीय शेतीसाठी दिलेल्या असामान्य योगदानासाठी देण्यात आला. बासमती व इतर प्रकारच्या भाताची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेण्याकरता हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.   डॉ. पवन गोएंका, व्यवस्थापकीय संचालक, महिंद्रा अँड महिंद्रा लि. म्हणाले, ‘आमच्या शेती समाजाने दिलेले योगदान हे या नव्या युगातील शेतीचा दाखला देणारे आहे, जे आम्ही आमच्या वार्षिक पुरस्कारांद्वारे साजरे करतो. महिंद्रा अग्री व्हिलेज (एमएव्ही) उपक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही सातत्याने ५० गावांबरोबर काम करतो. आमच्या प्रेरणा उपक्रमाने आतापर्यंत ४० गावांतील दोन हजार स्त्री शेतकऱ्यांचे लिंगभेद नसलेली शेतीची उपकरणे प्रचलित करून सबलीकरण केले आहे तसेच त्याद्वारे शेतीतील कष्ट कमी करून ज्ञान आणि आवश्यक क्षमतेचा प्रसारही केला आहे. ही मध्यस्थी क्रांतीकारी  आहे ती फार्मिंग ३.० बहरण्यासाठी आणि देशातील शेती तंत्र उंचावण्यासाठी आवश्यक चालना देणारी आहे असे आम्हाला वाटते.’

काही महिंद्रा वितरकांचे समृद्धी केंद्रांमध्ये रुपांतर करण्यात आले असून त्याद्वारे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि आधुनिक सोयींशिवाय तंत्रज्ञानाबद्दलची माहिती, हायब्रीड बियाणे, माती आणि सिंचन पाणी चाचणी सुविधा, शेतीचा नमुना, वित्त आणि विमा, इंटरनेट अपडेट्स उपलब्ध केले जातात.