रोहा स्थानकाजवळ मालगाडीचे चाक निखळल्याने एक डबा रूळावरून घसरला आहे. त्यामुळे कोकण रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्त वाहिनीने दिले आहे. रोह्याकडून ही मालगाडी कोलाडकडे जात होती. त्याचदरम्यान एका डब्याचा चाक निखळला व तो डबा रूळावरून घसरला.