News Flash

मुंबई-गोवा महामार्गावर एसटी आणि ट्रकच्या भीषण अपघातात ७ ठार, २० जखमी

अपघात इतका भीषण होता की बसच्या समोरील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला

भीषण अपघात.

मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या एसटी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात सात जण ठार, तर २० प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर निवळीजवळ हा अपघात झाला. बस आणि ट्रकमध्ये समोरासमोर झालेला हा अपघात इतका भीषण होता की बसच्या समोरील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. धडक दिलेल्या ट्रकला क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले. त्यानंतर काही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, तर सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 10:53 am

Web Title: major accident on mumbai goa highway
Next Stories
1 मुंबईतील इंग्रजी माध्यमाच्या १५८ शाळा अनधिकृत
2 सुरू होण्यापूर्वीच, संसार आगीत भस्मसात..
3 धावत्या गाडीतून पडून चार वर्षांत २१२७ मृत्यू
Just Now!
X