News Flash

गोरेगावच्या कामा इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आग; अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी

या घटनेची वर्दी मिळाल्यानंतर अग्निशामन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मुंबईच्या गोरेगाव परिसरात असणाऱ्या कामा इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये सोमवारी सकाळी आग लागल्याची दुर्घटना घडली. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास येथील एका गाळ्यात ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेची वर्दी मिळाल्यानंतर अग्निशामन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागलेला गाळा कापडाच्या व्यवसायासाठी वापरण्यात येत होता. त्यामुळे ही आग भडकण्याची शक्यता आहे. अग्निशामन दलाकडून आग पसरू न देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सकाळची वेळ असल्यामुळे याठिकाणी कोणीही नव्हते, त्यामुळे जीवितहानी टळली. दरम्यान, आगीची तीव्रता नेमकी किती आहे आणि ती आटोक्यात आणण्यासाठी किती वेळ जाईल, याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2016 7:47 am

Web Title: major fire at kama industrial estate in goregaon
Next Stories
1 आठवले विरुद्ध मायावती : नवा राजकीय संघर्ष
2 भ्रमणध्वनी चोरीची तक्रार ऑनलाइन!
3 सतीश माथूर यांनी पदभार स्वीकारला
Just Now!
X