News Flash

अंबरनाथमध्ये भीषण आग

अंबरनाथच्या आनंदनगर परिसरातील पॅसिफिक ऑर्गेनिक कंपनीला सोमवारी रात्री नऊच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीच्या ज्वालांमुळे बाजूच्या पोनिट्राक आणि मेलॉक या दोन कंपन्यासुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी

| October 14, 2014 02:17 am

अंबरनाथच्या आनंदनगर परिसरातील पॅसिफिक ऑर्गेनिक कंपनीला सोमवारी रात्री नऊच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीच्या ज्वालांमुळे बाजूच्या पोनिट्राक आणि मेलॉक या दोन कंपन्यासुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आग लागलेल्या कंपन्यांमध्ये काही कर्मचारी अडकल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या वतीने व्यक्त करण्यात येत असून त्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
आग लागलेल्या कंपन्यांमध्ये असलेल्या ड्रमचे मोठे स्फोट होत असल्याने आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांना मोठे प्रयत्न करावे लागत आहेत.
ही आग विझविण्यासाठी अंबरनाथ एमआयडीसी, नगर परिषद, बदलापूर, उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. आगीची तीव्रता जास्त असल्याने त्यावर रात्री उशिरापर्यंत नियंत्रण राखता येत नव्हते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 2:17 am

Web Title: major fire in ambernath
टॅग : Fire
Next Stories
1 चेंबूरमध्ये ९० वर्षीय वृद्धेवर तरुणाचा बलात्कार
2 वसंतदादा पाटील साखर कारखाना जमिनीच्या लिलावाला स्थगिती
3 बारावी अर्ज भरण्यास मुदतवाढ
Just Now!
X