X
X

दक्षिण मुंबईतील सिंदिया हाऊसला आग, जिवित हानी नाही

फोर्ट परिसरातील सिंधिया हाऊस ऑफिस बिल्डिंगला ही आग लागली आहे

दक्षिण मुंबईतील सिंदिया हाऊस या इमारतीला भीषण आग लागली आहे. फोर्ट परिसरातील बॅलार्ड इस्टेट येथील इन्कम टॅक्स ऑफिसजवळ ही इमारत आहे. दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारतीच्या गच्चीवर पाच व्यक्ती अडकल्या होत्या. ज्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.  अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुदैवाने अद्याप कोणीही जखमी झाल्याची माहिती आलेली नाही.

इन्कम टॅक्स खात्याचं ऑफिसही या इमारतीत असून या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. विविध देशी व आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यालयांसाठी हा विभाग प्रसिद्ध असून या परीसरात चांगलीच वर्दळ असते. परीसरात असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी या आगीचे फोटो व व्हिडीयो काढून ते सोशल मीडियावर अपलोड केले आणि हे वृत्त सगलीकडे पसरले.

तर एका व्यक्तिने या घटनेचे वृत्त ट्लिटरवर शेअर करताना सांगितलेस की या भागातून जात असताना आग लागल्याचे दिसले आणि अनेकजण बॅगा घेऊन अमारतीबाहेर पळताना बघायला मिळाले. परंतु कुठल्याही अधिकाऱ्यांना आपण बघितलं नसल्याचंही त्यानं म्हटलंय.

23
First Published on: June 1, 2018 5:51 pm
Just Now!
X