ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा करण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याचे आदेश मुंबई आणि पुणे महानगपालिकेला देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत याबाबतचे आदेश दिले. ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्याबाबत हाऊसिंग सोसायट्या, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थ उत्पादक कंपन्यांना येत्या दोन आठवड्यांत निर्देश द्यावे, असे न्यायालयाने सांगितले. याशिवाय, राज्य सरकारने अन्य महापालिकांनाही कचऱ्याप्रकरणी असेच निर्देश देण्याची सूचनाही न्यायालयाने यावेळी केली. दरम्यान, या सुनावणीच्यावेळी न्यायालयाने मुंबईतील शिववडा स्टॉल्सवरील कारवाईबाबतही पालिकेला विचारणा केली. या स्टॉल्सवरील कारवाईबाबतचा योग्य तो निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने पालिकेला १२ आठवड्यांची मुदत दिली आहे.
काही महिन्यांपूर्वी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर नवी मुंबईत शहरातील कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करण्याची कार्यवाही घनकचरा विभागाद्वारे प्रभावीपणे सुरू झाली होती. ओला आणि सुका कचरा वेगळा करून न देणाऱ्या सोसायटय़ांचा  कचरा गोळा करण्यात येऊ नये, असे आदेश महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले होते. त्यामुळे आता मुंबई आणि पुण्यातील नागरिकांनाही ही सवय लावून घ्यावी लागणार आहे.

mumbai municipal corporation, transparent administration
मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शी होणार? नागरिकांशी संवाद, संपर्क वाढविण्याचे मनपा आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आवाहन
bmc, mumbai municipal corporation, Tree Lights, Citing Environmental Concerns, tree lights in mumbai, mumbai tree lights, bmc Orders Removal of Tree Lights, mumbai news, environment news, dangerous for insects, bmc news, marathi news,
झाडांवरील रोषणाई सात दिवसात हटवा, पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयाना आदेश
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
road work contractor marathi news, mumbai municipal corporation marathi news
मुंबई: शहर भागातील कामे रखडवणाऱ्या कंत्राटदाराकडून अद्याप दंड वसुली नाही, एक महिन्याची मुदत संपूनही मुंबई महापालिकेची चालढकल