News Flash

मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाखांची मदत : अदित्य ठाकरे

दुर्घटनाग्रस्तांना संपूर्ण मदत करण्याच्या प्रशासनास सूचना

मालाड मालवणी येथे इमारतीचा भाग शेजारील घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरूवारी संबंधीत सर्व यंत्रणांशी संपर्क साधला. तसंच यावेळी त्यांनी दुर्घटनेची माहिती घेतली. दरम्यान, यावेळी त्यांनी दुर्घनाग्रस्तांना सर्व प्रकारची मदत तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही केल्या. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रूपयांची मदतदेखील त्यांनी यावेळी जाहीर केली.

या दुर्घटनेमध्ये २ जणांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले होते. जखमींवर रुग्णालयात उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी अडकलेल्यांनादेखील सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.

मालाड मालवणी येथील ओल्ड कलेक्टर कंपाऊंड एका इमारतीचा वरचा मजला बाजुच्या एका घरावर कोसळला होता. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, महापालिकेचे कर्मचारी, पोलीस यांच्यासह स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले होते. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले होते. दरम्यान, त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी या घटनेची माहिती घेतली असून त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. त्याचबरोबर इमारतीच्या उर्वरित भागातील घरांचीही इतरत्र तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी त्यांना मदत करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांना देण्यात येणार आहेत.

बाधित कुटुंबांना ५ हजारांची मदत

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये मदत देण्यात येणार असून बाधित कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबीयांना अतिरिक्त मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याबाबत जिल्हा प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 4:14 pm

Web Title: malad building collapse shiv sena leader minister aditya thackeray 4 lakh families of the victims jud 87
Next Stories
1 धक्कादायक : पनवेलमधील क्वारंटाइन सेंटरमध्ये बलात्काराची घटना
2 करोना योद्धे असलेल्या ६५० प्राध्यापक डॉक्टरांचा सेवेत कायम करण्यासाठी लढा!
3 जुळ्या बहिणींचे अनोखे जुळे यश…
Just Now!
X