बॉम्बस्फोट खटल्यात एटीएस आणि सीबीआयला चपराक 

मालेगाव येथील मशिदीबाहेर २००६ मध्ये घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील आठ आरोपींविरुद्ध पुरावे नसल्याचे स्पष्ट करत विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने या सर्व आरोपींना सोमवारी खटल्यातून दोषमुक्त केले. तब्बल दहा वर्षांनंतर या आरोपींवरील दहशतवादाचा ठपका पुसला गेला आहे. विशेष म्हणजे या आठजणांना आरोपी ठरवत त्यांच्यावर खटला भरणाऱ्या राज्याचे दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) न्यायालयाच्या निर्णयाने सणसणीत चपराक लगावली आहे.

Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
nagpur court marathi news, nagpur petitioner donate 25 thousand
दे दान सुटे गिऱ्हाण! कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावली अनोखी शिक्षा; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
Rashmi Barve
रश्मी बर्वे प्रकरणावर बुधवारी सुनावणी, जातवैधता प्रमाणपत्रामुळे निवडणूक अर्ज रद्द
Arvind kejriwal
केजरीवाल तिहार जेलमध्ये रामायणासह पंतप्रधानांबाबतचं ‘हे’ पुस्तक वाचणार, न्यायालयाकडे ‘या’ वस्तूंसाठी परवानगी अर्ज

अटकेत असलेल्या आरोपींचा या बॉम्बस्फोटाशी संबंध नाही, असे प्रकरणाचा नव्याने तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) न्यायालयासमोर स्पष्ट केल्यानंतर आरोपींनी सुरुवातीला जामिनासाठी अर्ज केला होता. ‘एनआयए’ने घेतलेल्या भूमिकेनंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती. त्यानंतर आरोपींनी खटल्यातून दोषमुक्त करण्यासाठी अर्ज केला होता. विशेष ‘मोक्का’ न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आरोपींचा अर्ज मान्य करत त्यांना अखेर या खटल्यातून दोषमुक्त केले.

प्रकरण नेमके काय?

८ सप्टेंबर २००६ रोजी ‘शब-ए बारात’साठी मालेगाव येथील हमिदा मशीद परिसरात मुस्लीम समुदाय मोठय़ा प्रमाणात जमला होता. त्या वेळी मशिदीबाहेर लागोपाठ दोन बॉम्बस्फोट घडवण्यात आले. या बॉम्बस्फोटामध्ये ३७ लोकांना जीव गमवावा लागला होता, तर १०० जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला एटीएसने करत ‘सिमी’शी संबधित नऊजणांना अटक केली होती व त्यांनीच बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे आरोपपत्रही दाखल केले होते. त्यानंतर तपास  सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. सीबीआयनेही याच आरोपींनी बॉम्बस्फोट घडवल्याचे सांगत एटीएसच्या तपासावर शिक्कामोर्तब केले होते. परंतु सीबीआयकडून प्रकरणाचा तपास काढून घेण्यात येऊन तो ‘एनआयए’कडे सोपवण्यात आला. ‘एनआयए’ प्रकरणाचा नव्याने तपास करताना या बॉम्बस्फोटाशी या आरोपींचा नव्हे, तर बहुसंख्य समुदायाच्या गटाचा संबंध असल्याचा गौप्यस्फोट करत चौघांना अटकही केली होती. एटीएस आणि सीबीआयने सादर केलेले पुरावे नव्या पुराव्यांशी मेळ खात नाहीत, असे स्पष्ट करत तसा अहवालही ‘एनआयए’ने न्यायालयात सादर केला होता. तसेच या नव्या तपासाच्या आधारे न्यायालयाने संबंधित आरोपींविषयी आवश्यक तो निर्णय द्यावा, असेही ‘एनआयए’तर्फे न्यायालयाला सांगण्यात आले होते.

अटक केलेले आरोपी

‘एनआयए’ने प्रकरणाचा नव्याने तपास करून अटक केलेल्या आरोपींमध्ये मनोहर नरीवाला ऊर्फ सुमेर ठाकूर, राजेंद्र चौधरी ऊर्फ दशरथ, धनसिंह आणि लोकेश शर्मा यांचा समावेश आहे. या सगळ्यांवर ‘एनआयए’ने त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले असून त्यांच्यावरील खटला सध्या प्रलंबित आहे.

स्वामी असिमानंदांमुळे तपासाला नवे वळण!

२००७च्या मक्का मस्जिद बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी स्वामी असिमानंदने २००६मध्ये मालेगाव येथे मशिदीबाहेर घडवलेले बॉम्बस्फोट हे हिंदुत्ववादी गटाने केल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर २००६च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाला नवे वळण मिळाले होते. त्याचआधारे ‘एनआयए’ने या ८ आरोपींविरुद्ध पुरावा नसल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला होता.