News Flash

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात आरोपी अनुपस्थित

मालेगाव बॉम्बस्फोट खटला

मालेगाव बॉम्बस्फोट खटला

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सगळ्या आरोपींना हजर राहण्याचे आदेश देऊनही प्रमुख आरोपी भाजपच्या भोपाळ येथील खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात आरोपी गुरुवारी न्यायालयासमोर अनुपस्थित राहिले. त्यांना विशेष न्यायालयाने १९ डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी.आर. सित्रे यांनी या खटल्यातील सगळ्या आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र साध्वी यांच्यासह सात आरोपी अनुपस्थित राहिले. अन्य चार आरोपी हे करोनाच्या स्थितीमुळे न्यायालयासमोर हजर झाले नसल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला दिली. गुरुवारी पुरोहित, समीर कुलकर्णी आणि अजय राहिरकर हे तिघेच न्यायालयासमोर हजर झाले. साध्वी प्रज्ञा या गेल्या वर्षी न्यायालयासमोर हजर झाल्या होत्या.

खटल्याला स्थगिती नाहीच

या प्रकरणाला स्थगिती दिली नसल्याचे उच्च न्यायालयानेही गुरुवारी स्पष्ट केले. किंबहुना खटला सुरूच राहिला पाहिजे, असे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने म्हटले. आवश्यक ती मंजुरी न घेताच कारवाई करण्यात आल्याचा दावा करत आपल्यावरील आरोप रद्द करण्याची मागणी खटल्यातील प्रमुख आरोपी प्रसाद पुरोहित याने केली आहे. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने खटल्याच्या स्थितीबाबत विचारणा केली. तेव्हा खटल्याची नियमित सुनावणी शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेतर्फे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 2:45 am

Web Title: malegaon bomb blast case seven accused including sadhvi pragya singh thakur absent in court zws 70
Next Stories
1 वरवरा राव यांना रुग्णालयात ठेवण्याचे आदेश
2 पदवीधर-शिक्षक मतदारसंघांमध्ये भाजपची पीछेहाट
3 कांदिवलीत दोन मुलींसह व्यावसायिक मृतावस्थेत
Just Now!
X