22 September 2020

News Flash

नवी मुंबईत एक दिवसच उघडले मॉल, ३१ ऑगस्टपर्यंत मॉल्स बंद ठेवण्याचे पालिकेचे आदेश

एक दिवसापुरतेच उघडले गेले मॉल

संग्रहित छायाचित्र

लोकसत्ता,प्रतिनिधी
नवी मुंबई-मिशन बिगिन अगेन अंतर्गत बुधवारपासून शहरातील मॉल सुरु झाले. मात्र शहरातील मॉल सुरु झाल्याचा मॉलमधील दुकानदारांचा व ग्राहकांचा आनंद एका दिवसापुरताच ठरला. नवी मुंबई महापालिकेने बुधवारी संध्याकाळी ३१ ऑगस्टपर्यंत शहरातील मॉल,मल्टीपेक्स चित्रपटगृह,फुट कोर्ट, रेस्टॉरन्ट तसेच मॉलमधील फुडकोर्ट व रेस्टॉरन्ट व फुडकोर्ट बंद ठेवण्याचे आदेश लागू करण्यात आले. त्यामुळे मॉल सुरु झाल्याचा आनंद क्षणिक ठरला आहे. गुरुवारी काही ग्राहक आज सकाळी ११ नंतर मॉलमध्ये खरेदासाठी गेले असता त्यांना मॉल बंद असल्याचे ३१ ऑगस्ट पर्यंत मॉल बंद राहणार असल्याचे सुरक्षारक्षकांनी सांगीतले. त्यामुळे अनेकांची निराशा झाली असून मॉल व्यवस्थापनानेही नाराजी व्यक्त केली आहे.

जवळजवळ सोडचार महिन्यानंतर मॉलचे शहर असलेल्या नवी मुंबईत लगबग सुरु झाल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. मॉल व्यवस्थापनानेसुध्दा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याबरोबरच ग्राहकांच्या आरोग्याची खबरदारी घेण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून आले होते. तर सीवूड्स येथील ग्रॅन्ड सेन्ट्रल मॉलमध्ये पहिल्या ५० ग्राहकांना मोफत छत्र्या वाटप करुन स्वागत करण्यात आले होते.परंतू जोराचा पाऊस व सोसाट्याचा वारा यामुळे पहिल्याच दिवशी नागरीक कमी प्रमाणात आल्याचे पाहायला मिळाले.परंतु बुधवारी संध्याकाळी पालिकेने ३१ ऑगस्टपर्यंत मॉल बंद ठेवण्यात आल्याचे आदेश दिल्याने मॉल सुरु करण्यासाठी करण्यात आलेली तयारी वाया गेल्याची भावना व्यक्त करण्यात येत होती.

मुंबईत सर्वच दुकाने सुरु करण्यात आली आहेत. नवी मुंबईत सम-विषम प्रमाणात दुकाने सुरु आहेत. नवी मुंबई वगळता ठाणे जिल्ह्यात सर्वत्र मॉल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे एकीकडे नवी मुंबई वगळता संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मॉल बंद व नवी मुंबईत मॉल सुरु असल्याने मंत्रालय पातळीवर नाराजी असल्याचे बोलले जात आहे.दुसरीकडे नवी मुंबई शहरात करोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असून त्यावर निर्बंध आणण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील असताना दुसरीकडे मॉल चालू केल्याने शहरातील ब्रेक द चेन उपाययोजनेचा उपयोग होणार नसल्याचे बोलले जात होते.तसेच मॉलमध्ये येणारी गर्दी व तेथील सोशल डिस्टंन्सिंगबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.स्थानिक प्रशासनाच्या प्रमुखांना दिलेल्या अधिकाऱाच्या अनुषंगाने मॉल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.त्यामुळे शहरातील मॉल ,चित्रपटगृह,हॉटेल आता ३१ ऑगस्टपर्यंत बंदच राहणार आहेत.

संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये फक्त नवी मुंबईत मॉल सुरु करण्यात आले होते. शहरातील मॉलमध्ये शहराबाहेरील येणाऱ्यांची संख्या तसेच सामाजिक अंतर याबाबतचे नियम डावलले जात असल्याचे निदर्शनास आल्याने शहरातील करोनावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात मॉलमधील गर्दी बाधा ठरु नये म्हणून मॉल,चित्रपटगृहे,हॉटेल्स,फूड मॉल ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अभिजीत बांगर,आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 9:57 pm

Web Title: malls open in navi mumbai for one day only now close till 31st august scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 नवी मुंबईत करोना बाधितांची संख्या १७ हजार पार
2 नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना करोनाची बाधा, लीलावती रुग्णालयात दाखल
3 मुंबई लोकलमध्ये चोरीला गेलेलं पाकिट सापडलं १४ वर्षांनी
Just Now!
X