14 December 2017

News Flash

किंगफिशर कर्मचाऱ्यांना वेतन देऊन मल्ल्यांचा सुखद धक्का

किंगफिशर एअरलाइन्सचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या यांनी कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. आपल्या परवान्याचे नूतनीकरण

पीटीआय ; मुंबई | Updated: February 20, 2013 4:11 AM

किंगफिशर एअरलाइन्सचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या यांनी कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. आपल्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी हवाई वाहतूक नियामक प्राधिकरणाकडे संपर्क साधतानाच त्यांनी कर्मचाऱ्यांना महिन्याचे वेतनही दिले आहे.
आमच्यापेकी काही कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले आहे. ज्यांचे वेतन सर्वात कमी आहे त्यांना आणि काही अभियंते आणि वैमानिकांना वेतन देण्यात आले असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.  गेल्या मे महिन्यापासून एअरलाइन्सच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना वेतन दिले नव्हते. एअरलाइन्सच्या विमानांना उड्डाणाची परवानगी द्यावी, अशी नव्याने विनंती करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अग्रवाल हवाई वाहतूक महासंचालकांची भेट घेण्यासाठी येथे आले आहेत. तथापि, या घडामोडींना अद्याप अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही.

First Published on February 20, 2013 4:11 am

Web Title: mallya surprises kfa staff with months salary ceo meets dgca