News Flash

वनराई पोलिसांच्या ताब्यातील आरोपीचा मृत्यू

वनराई पोलिसांनी चोरी प्रकरणी अटक केलेल्या एका चोराचा रविवारी मृत्यू झाला. मनोज साळवे (२२) असे त्याचे नाव आहे.

| October 28, 2013 02:45 am

वनराई पोलिसांनी चोरी प्रकरणी अटक केलेल्या एका चोराचा रविवारी मृत्यू झाला. मनोज साळवे (२२) असे त्याचे नाव आहे. शनिवारी त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
गोरेगावच्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये भरलेल्या प्रदर्शनात लोकांच्या बॅगा चोरताना सुरक्षा रक्षकांनी मनोज साळवे (२२) आणि प्रकाश चव्हाण (२३) यांना रंगेहाथ अटक केली होती. त्यांना बेदम मारहाण करुन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. शनिवारी रात्री आपल्याला श्वसनाचा त्रास होत असल्याची तक्रार साळवेने केल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाकडे आम्ही कोठडीतील मृत्यू म्हणून बघत असल्याचे पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील (परिमंडळ १२) यांनी सांगितले. साळवेचा शवविच्छेदन अहवाल सोमवारी मिळण्याची अपेक्षा आहे. मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे अहवालात निष्पन्न झाल्यास सुरक्षा रक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असे वनराई पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2013 2:45 am

Web Title: man accused of theft dies in police custody
Next Stories
1 भविष्य निधीबाबत सूचना, तक्रारी मांडण्याचे आवाहन
2 कांद्याचे साठेबाज दलाल काँग्रेस-राष्ट्रवादीचे
3 निवृत्तीनंतर घर हिरावून घेऊ नका..
Just Now!
X