26 September 2020

News Flash

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत

रबाले येथील भिमनगरमधील कन्नडवाडीमधील एका १३ वर्षीय मुलीवर दारूच्या नशेत बलात्कार करणाऱ्याला रबाले एमआयडीसी पोलसांनी मंगळवारी रात्री अटक केली आहे.

| June 19, 2014 12:02 pm

रबाले येथील भिमनगरमधील कन्नडवाडीमधील एका १३ वर्षीय मुलीवर दारूच्या नशेत बलात्कार करणाऱ्याला रबाले एमआयडीसी पोलसांनी मंगळवारी रात्री अटक केली आहे. पिडीत मुलीला आईला जीवे मारण्याची धमकी देत, त्याने अत्याचार केला होता.
राजेश गंगय्या नाईक (४५) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी पिडीत मुलीच्या घराशेजारीच राहणारा असून रविवारी रात्री दारूच्या नशेत असलेला राजेश त्याने घरात पिडीत मुलीची आई नसल्याचा फायदा घेत घरात घुसला. यावेळी पिडीत मुलीच्या लहान भावांना त्यांनी घराबाहेर काढले.
यानंतर पिडीत मुलीला आई जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. या घटनेनंतर त्याने पळ काढला होता. पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीवरून राजेश याच्या विरोघीत गुन्हा दाखल करत मंगळवारी रात्री अटक करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2014 12:02 pm

Web Title: man arrested for molesting minor girl
टॅग Molestation
Next Stories
1 लोअर परळ कारशेडमध्ये कामगाराचा अपघाती मृत्यू
2 पुढचा मुख्यमंत्री १०० टक्के शिवसेनेचाच – ‘सामना’तून वचन
3 महायुतीतील पक्षांशी चर्चा करूनच मुख्यमंत्रीपदाचा निर्णय – उद्धव ठाकरे
Just Now!
X