News Flash

अंध तरुणीच्या विनयभंग प्रकरणी अटक

पश्चिम रेल्वेवर उपनगरी गाडीत एका अंध तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तरुणास रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

पश्चिम रेल्वेवर उपनगरी गाडीत एका अंध तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तरुणास रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. रोहित नंदू असे या आरोपीचे नाव असून ही घटना डिसेंबर महिन्यात घडली होती.
अंधेरी येथे जाण्यासाठी ही अंध तरुणी खार रेल्वे स्थानकावर उभी होती. फलाटावर गाडी आल्यानंतर त्याने तिला मालवाहतूक डब्यात नेले मुलीने आरडाओरड करताच अंधेरी रेल्वे स्थानकावर उडी टाकून तो पळून गेला. वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी ‘सीसी टीव्ही’च्या चित्रीकरणाच्या मदतीने तपास सुरु केला. पोलिसांच्या पथकाने या अंध तरुणीचे महाविद्यालयातील सहकारी, शिक्षक, कर्मचारी तसेच रेल्वे स्थानकावरील हमाल, बुटपॉलीश करणारे अशा सुमारे दोन हजार व्यक्तिंना छायाचित्र दाखविण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2016 12:02 am

Web Title: man arrested in blind girl molestation case
Next Stories
1 अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी तरुणाला अटक
2 ‘मेक इन इंडिया सप्ताह’मधील आगीच्या घटनेने अमिताभ दु:खी
3 चौपाटीवरील भीषण आगीत तुकोबांची मुर्ती सुखरूप…
Just Now!
X