News Flash

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना गंडा

या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे

प्रातिनिधिक छायाचित्र

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ठाण्यात ३० तरुणांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमारे ८६ लाख ५० हजार रुपयांनी या  गंडा घालण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

नाशिकमध्ये राहणाऱ्या मयुर पाटील या तरुणाला दिनेश लहारेने पाटबंधारे विभागात नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. नोकरीच्या मोबदल्यात लहारेने त्याच्याकडून तब्बल १७ लाख ५० हजार रुपये उकळले. मात्र, पैसे देऊन दीड वर्ष झाले तरी नोकरी मिळत नसल्याने मयुर पाटीलने लहारेकडे तगादा लावला. शेवटी संशय आल्याने मयुर पाटीलचे वडील दिलीप पाटील यांनी ठाणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यानंतर आणखी काही तरुणांनी ठाणे पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रँचनेही तपास सुरु केला. आरोपींकडून पोलिसांनी सरकारी विभागांचे ३३ बनावट शिक्केही जप्त केले आहेत.

दिनेश लहारे हा ठाण्यातील धोबीआळी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार २४ नोव्हेंबररोजी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. दिनेश लहारेने भांडूपमध्ये ऑफीस सुरु केले. पाटबंधारे विभागासह रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग, पोलीस दल, महावितरण अशा विविध सरकारी विभागांमध्ये नोकरी लावून देतो असे सांगत त्याने तब्बल ३१ जणांकडून पैसे घेतले. लोहारेने या बेरोजगार तरुणांकडून एकूण ८६ लाख ५० हजार रुपये घेतल्याचे उघड झाले आहे. दिनेश लहारेने आणखी काही तरुणांना अटक केल्याचा संशय आहे. लोहारेविरोधात यापूर्वी संगमनेर आणि अहमदनगर पोलीस ठाण्यातही फसवणुकीचे गुन्हे दाखल होते, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी दिनेशसह आणखी चार आरोपींना अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 7:30 pm

Web Title: man cheats unemployees in name of government jobs thane crime branch
Next Stories
1 मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरण; तीन आरोपींचा जामीनअर्ज फेटाळला
2 एल्फिन्स्टनमध्ये सरकते जिने
3 नारायण राणे यांची भाजपकडूनही कुचंबणा!
Just Now!
X