पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकादरम्यान टपावर बसून प्रवास करणारा तरुण ओव्हर हेडवायरला चिकटल्याची दुर्घटना घडली आहे. दरम्यान ओव्हर हेडवायरमधील विद्युत प्रवाह खंडीत करण्यात आला असून या अपघातामुळे पश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. विरारच्या दिशेने जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक वांद्रे स्थानकापर्यंत जलद मार्गावर वळविण्यात आली आहे. परिणामी धीम्या आणि जलद अशा दोन्ही मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. या मार्गावरील स्थानकादरम्यान चाकरमान्यांची गर्दी वाढताना दिसत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 29, 2016 8:00 pm