आपल्या बायकोला सरप्राइज द्यायचे म्हणून तिच्यासाठी तिच्या नवऱ्याने एक गिफ्ट घेतले. गिफ्ट घेऊन तो विद्याविहारहून कल्याण लोकलमध्ये बसला. ठाकुर्ली स्टेशनला उतरला आणि त्याच्या लक्षात आले की आपण गिफ्ट ट्रेनमध्येच विसरलो. सागर मवाणी असे या प्रवाशाचे नाव आहे. सागरला कळेना की गिफ्ट मिळवायचे कसे? सुरूवातीला त्याने RPF हेल्पलाइन क्रमांकावर फोन केला. पण तिथे काही प्रतिसाद मिळाला नाही. मग सागरने सेंट्रल रेल्वेला ट्विट केला.

”मी विद्याविहारहून कल्याण लोकलमध्ये बसलो आणि ठाकुर्लीला उतरलो. मात्र माझ्या हातात एक गिफ्टची पिशवी होती ज्यावर सलोनी असे लिहिले होते. ती पिशवी मी लोकल ट्रेनमध्येच विसरलो आहे. कल्याणकडे जाणाऱ्या चौथ्या डब्यात मी बसलो होतो. मी जी बॅग विसरलो त्यात पत्नीसाठी घेतलेली मौल्यवान भेट होती. मला ती परत मिळू शकेल का?” असा ट्विट सागरने केला.

ज्यानंतर तातडीने रिप्लाय करत RPF ने सागरला मदत करावी असे सांगण्यात आले. त्यानंतर काही वेळातच सागरला तो विसरलेली बॅग मिळाली. मध्य रेल्वेचे मी आभार मानतो असा ट्विट सागरने केला. ज्यानंतर Pleasure Happy to see you Happy असा ट्विट मध्य रेल्वे केला. एरवी मध्य रेल्वेला प्रवासी कायम नावं ठेवत असतात. मात्र या घटनेने मध्य रेल्वेने या सागरचे मन जिंकले आहे.