मुंबईच्या लोकलमध्ये पाकिट चोरीला गेलं तर ते मिळणं हे स्वप्नवतच असतं. चोरीला गेलेलं पाकिट मिळेल अशी आशा बहुतांश मुंबईकर सोडूनच देतात. मात्र एका प्रवाशाचं चोरीला गेलेलं पाकिट दोन-तीन नाही तब्बल १४ वर्षांनी सापडलं आहे.

काही दिवसांपूर्वीच रेल्वे पोलिसांनी या माणसाला त्याचं चोरीला गेलेलं पाकिट मिळाल्याचं सांगितलं. तेव्हा या माणसाचा विश्वासच बसला नाही. हेमंत पडाळकर असं या ४२ वर्षीय माणसाचं नाव आहे. चौदा वर्षांपूर्वी म्हणजेच २००६ मध्ये सीएसएमटी-पनवेल लोकलमध्ये त्याचं पाकिट मारलं गेलं. पाकिट गेलं तेव्हा त्याच्या पाकिटात ९०० रुपये होते. याबद्दल त्याने पोलिसात तक्रारही दिली. मात्र पाकिट मिळेल अशी आशा त्याने सोडूनच दिली होती. एप्रिल महिन्यात हेमंत यांना फोन आला ज्यामध्ये तुमचं हरवलेलं पाकिट सापडल्याचं पोलिसांनी त्याला सांगितलं.

australia church stabbing
ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा चाकूहल्ला; यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना माथेफिरूचा हल्ला
Thane Police Arrests, Interstate Thief Operating, Between Assam and Mumbai, Solves 22 Cases, theft of assam, thane theft, navi mumbai theft, mumbai theft, aeroplane, marathi news, crime news, robbery news,
चोरीसाठी विमानाने मुंबईचा प्रवास, नागालँड आसाम मधील चोरट्याला अटक
youth murder
वसई : अपघात नव्हे ही तर हत्या, ३ वर्षांनी हत्येला फुटली वाचा
Sonam Wangchuk
लेख: लडाखवासींची लोककेंद्री विकासासाठी हाक

हेमंत पाडळकर हे आता ४२ वर्षांचे आहेत. २००६ मध्ये त्यांचं पाकिट चोरलं गेलं तेव्हा त्यांच्या पाकिटात ९०० रुपये होते. या पूर्ण पैशांसह त्यांना पाकिट मिळालेलं नाही. कारण ५०० रुपयांची जी नोट त्यावेळी त्यांच्या पाकिटात होती ती आता बाद झाली आहे. नोटबंदीच्या आधी चलनात असलेली ५०० ची नोट त्यांच्या पाकिटात होती. ती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. ‘मुंबई मिरर’ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

त्यावेळी माझं पाकिट मारलं गेलं तेव्हा मी तातडीने पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी मात्र मी फॉलो अप नाही घेतला. या गोष्टीला बरीच वर्षे झाल्यानंतर म्हणजे आत्ता तब्बल १४ वर्षांनी पोलिसांनी मला फोन करुन माझे पाकिट मिळाले असल्याची माहिती दिली. त्यामध्ये ९०० रुपये होते त्यातले ५०० रुपये हे जुन्या चलनातले असल्याने पोलिसांनी ती नोट मला दिली नाही असंही पाडळकर यांनी म्हटलं आहे.