News Flash

तरुणीला अश्लील लघुसंदेश पाठविणाऱ्यास अटक

गावदेवी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीला रात्रीच्या वेळेत अश्लील लघुसंदेश येण्यास सुरुवात झाली.

 

तरुणीला अश्लील लघुसंदेश पाठविणाऱ्या कुमार करण (२८) या उच्चशिक्षित तरुणाला मुंबई पोलिसांनी बिहार येथून अटक केली आहे. महाविद्यालयात एकत्र असताना या तरुणाने तरुणीचा भ्रमणध्वनी क्रमांक घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याने या तरुणीला रात्रीच्या वेळी अश्लील लघुसंदेश पाठविण्यास सुरुवात केली होती. आरोपीने कायद्याचे शिक्षण घेतले असून तो पाटणा उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहे, गावदेवी पोलिसांनी त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याची जामीनावर मुक्तता करण्यात आली.

गावदेवी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीला रात्रीच्या वेळेत अश्लील लघुसंदेश येण्यास सुरुवात झाली. संदेशांचे हे सत्र थांबत नसल्याचे पाहून तरुणीने गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गावदेवी पोलिसांनी अज्ञात इसमांविरोधात तक्रार दाखल करुन त्याच्या भ्रमणध्वनी क्रमांकाच्या आधारे माग काढला असता बिहारमधील पाटणा येथे तो असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तेथून त्याला अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 12:40 am

Web Title: man held for sending obscene messages to mumbai woman
Next Stories
1 संरक्षणाचे साडेपाच कोटींचे भाडे करोडपतींनी थकवले
2 ‘मुंबईत एम्स रुग्णालय उभारावे’
3 भुजबळ अटक पडसाद : मुंबईतून २०० कार्यकर्ते ताब्यात
Just Now!
X