17 July 2019

News Flash

धक्कादायक! मुंबईत व्हिडिओ कॉल करुन तरुणीला गुप्तांग दाखवण्याचा प्रयत्न

मलबार हिल येथे राहणाऱ्या एका फॅशन डिझायनरच्या मुलीला व्हिडिओ कॉल करुन तिला गुप्तांग दाखवणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

मलबार हिल येथे राहणाऱ्या एका फॅशन डिझायनरच्या मुलीला व्हिडिओ कॉल करुन तिला गुप्तांग दाखवणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे वडिल पीडित मुलीच्या आईने डिझाईन केलेले ड्रेस शिवण्याचे काम करतात. आरोपीने गुन्ह्यासाठी शरीरविक्रीय करणाऱ्या महिलेचा मोबाइन फोन वापरला. फय्याज अहमद असे आरोपीचे नाव असून तक्रार दाखल झाल्यानंतर दहा तासांच्या आत गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली.

मध्यरात्रीच्या सुमारास आपल्याला व्हिडिओ कॉल आला. मी कॉल उचलल्यानंतर पलीकडच्या व्यक्तीचा चेहरा दिसत नव्हता. पण तो अश्लील कृती करत होता. मी लगेच तो फोन ठेवला. पण त्याच नंबरवरुन काही मिनिटात दुसरा व्हिडिओ कॉल आला. आपल्या आईने सुद्धा हा व्हिडिओ कॉल पाहिला असे तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर संबंधित फॅशन डिझायनरने मुलीला सोबत घेऊन तडक मलबार हिल पोलीस स्टेशन गाठले व तक्रार नोंदवली.

पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच तपास सुरु केला. ज्या नंबरवरुन हा व्हिडिओ कॉल आला होता त्या मोबाइलचे लोकेशन बोरीवलीमध्ये होते. एका नेपाळी नागरीकाचा हा फोन होता. ज्या दिवशी पीडित मुलीला व्हिडिओ कॉल केला तेव्हा तो फोन आपल्या पत्नीकडे होता. आपली पत्नी ग्रॅण्टरोडला राहते असे त्या नेपाळी नागरीकाने सांगितले. दोन दिवसांपूर्वी पत्नी आपल्याला भेटण्यासाठी आली होती पण आमच्यात भांडण झाल्यामुळे ती निघून गेली. माझा फोन तिच्याकडे आहे असे त्याने सांगितले.

त्यानंतर नेपाळी नागरीकाने त्याच्याकडे असलेल्या दुसऱ्या फोनवरुन पत्नीला फोन केले पण तिने फोन उचलला नाही. तपासामध्ये पोलिसांना ही शरीरविक्रीय करणारी महिला असल्याचे समजले. अखेर पोलिसांनीच ग्राहक बनून या महिलेशी संर्पक साधला. जेव्हा पोलिसांनी या महिलेला त्या अश्लील व्हिडिओ कॉलबद्दल विचारले तेव्हा तिने एका ग्राहकाने आपल्या मोबाइलवरुन हा कॉल केल्याचे सांगितले.

पत्नीला फोन करायचा आहे असे सांगून ग्राहकाने आपल्याकडून फोन घेतला होता. पण त्याच्या अश्लील कृती पाहून आपण लगेच त्याच्याकडून फोन हिसकावून घेतला असे तिने पोलिसांना सांगितले. या महिलेने त्या ग्राहकाला फोन केला तेव्हा त्याचा नंबर स्विचऑफ येत होता. त्यानंतर पोलिसांनी शरीरविक्रीय करणाऱ्या महिलेच्या मदतीने सापळा रचून आरोपीला वरळी सीफेसवर बोलावले.

पोलीस तिला खासगी कारमधून वरळी सीफेसला घेऊन गेले. पोलिसांच्या निर्देशानुसार तिने आरोपीला भेटण्यासाठी गाडीत बोलावले. आरोपी गाडीमध्ये येताच पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीमध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीचे वडिल फॅशन डिझायनर महिलेसाठी ड्रेस शिवण्याचे काम करायचे. काहीवेळा तिची मुलगी हे ड्रेस आणण्यासाठी जायची. त्यावेळी आरोपीची नजर तिच्यावर पडली होती.

First Published on December 7, 2018 10:41 am

Web Title: man held for showing private parts to woman on video call