मुंबई : तरुणीची आक्षेपार्ह छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवरून ‘व्हायरल’ करण्याची धमकी देणाऱ्यास गुन्हे शाखेने कळवा येथून अटक के ली. आरोपी आकाश पवार(२६) इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर असून तो आणि तक्रोरदार तरुणी एकमेकांना ओळखतात. प्रियकरासोबतची छायाचित्रे व्हायरल करेन अशी धमकी देऊन आकाशने तरुणीकडून तीन अश्लील, बीभत्स ध्वनिचित्रफिती तयार करवून घेतल्या होत्या.

आकाशची मागणी वाढू लागताच तरुणीने पश्चिम उपनगरातील एका पोलीस ठाण्यात तक्रोर दिली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेच्या कांदिवली कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने आणि पथकाने तपास करून आकाशला अटक के ली.

आकाश काही वर्षांपूर्वी मुंबईबाहेरील एका शिक्षण संस्थेत शिकत असताना त्याची ओळख तक्रोरदार तरुणीसोबत झाली. दोघांमध्ये मैत्री होती. आकाश मात्र तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. तरुणीला हे संबंध मान्य नसल्याने आकाशने सूड घेण्याच्या इराद्याने तरुणीच्या इमेल आयडीचा पासवर्ड मिळवून तिच्या आयुष्यातील काही खासगी क्षणांची छायाचित्रे हस्तगत के ली. ही छायाचित्रे ‘इन्स्टाग्राम’द्वारे व्हायरल करेन अशी धमकी देत त्याने तरुणीकडून तीन ध्वनिचित्रफिती तयार करून घेतल्या. तो या तरुणीला आणखी भयंकर कृ ती करण्यास भाग पाडत होता. तेव्हा तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. तरुणीच्या इमेल आयडीचा पासवर्ड तिचा मोबाइल क्र मांक होता. हे आरोपी आकाशला माहीत होते, या मुद्दय़ावर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तमाम नेटिझन्सना आपले तपशील गुप्त ठेवण्याची सूचना के ली आहे.