छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमातळावर शनिवारी एका प्रवाशास अटक करण्यात आली. त्याच्याकडून १२.३ लाख किंमतीचे ४६४ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. आरोपी करकाला सुलेमान हा जेट एअरवेजने रियाध येथून आला होता. ‘एआयू’ टीमला त्याचे हावभाव संशयास्पद वाटल्याने त्याची संपूर्ण तपासणी करण्यात आली. त्यावेळेस त्याच्याकडे पाच सोन्याच्या वीटा सापडल्याचे अधिकृत अधिका-याने सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 23, 2013 4:24 am
Web Title: man held with gold bars valued at rs 12 3 lakh at airport