News Flash

मुंबई गोळीबाराने हादरली; मालाडमध्ये तरुणीच्या हत्येने खळबळ

इन्फिनिटी मॉलच्या मागे ही घटना घडली

मुंबईत डोक्यावर गोळी झाडून तरुणीची हत्या करण्यात आली आहे. २६ वर्षीय तरुणाने तरुणीची हत्या केल्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. सोमवारी मालाडमधील इन्फिनिटी मॉलच्या मागे रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात मात्र खळबळ माजली आहे. दोघांमध्येही प्रेमसंबंध होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गोळीबारानंतर काही स्थानिकांनी कंट्रोल रुमला फोन करुन पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर दोघांनाही कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथे दाखल होण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आलं. दोघांच्याही कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीची हत्या केल्यानंतर तरुणाने मंदिरात स्वत:वर गोळी झाडून घेतली. दोघांचीही ओळख पटली असून राहुल यादव आणि निधी मिश्रा अशी त्यांची नावं आहेत. राहुल हा कांदिवलीचा तर निधी मालाडची रहिवासी होती.

आणखी वाचा- नवी मुंबई : उघड्यावर लघुशंका करण्यावरुन झालेल्या वादातून एकाची हत्या

“निधी मिश्राचा दुसऱ्या एका व्यक्तीसोबत साखरपुडा झाला होता. याच कारणामुळे राहुलने तिच्यावर गोळीबार करुन हत्या केली असावी,” असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस नेमकं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल जप्त केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 9:15 am

Web Title: man kills self after shooting friend in malad of mumbai sgy 87
Next Stories
1 नवी मुंबई : उघड्यावर लघुशंका करण्यावरुन झालेल्या वादातून एकाची हत्या
2 ‘पीओपी’वरील बंदीमुळे मूर्तीकारांपुढे विघ्न
3 सरपंचपदांच्या लिलावांची चौकशी
Just Now!
X