19 October 2019

News Flash

ठाणे – एटीएममध्ये तरूणीशी अश्लील वर्तन, व्हिडीओवरून तरुणाला अटक

रविवारी पहाटे आडीच वाजण्याच्या सुमारास मुलुंडमध्ये हा प्रकार घडला आहे.

मुलुंडमध्ये एटीएममधून पैसे काढताना एका तरूणीशी अश्लील वर्तन केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ३८ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. संदीप कुंभारकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संदीप कुंभारकरने एटीएममध्ये तरूणीशी अश्लील चाळे केले. त्या तरूणाच्या अश्लील चाळ्याचा व्हिडीओ तरूणीनं काढून ट्विटरवर पोस्ट केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.

तक्रारीनुसार, रविवारी सकाळी आडीच वाजण्याच्या सुमारास मुलुंड पश्चिममधील एका एटीएममध्ये २३ वर्षीय तरूणी पैसे काढायला गेली होती. पैसे काढताना तरूणीला काही अडचण येत होती. त्यावेळी तेथे आलेल्या संदीप कुंभारकर या तरुणाने तिला मदत करू का, असे विचारले. तरूणीनं त्याला स्पष्टपणे नकार दिला. रागातून संदीप कुंभारकरने तिला अश्लील स्पर्श केला. पुढे पैसे काढतेवेळी तिच्यासमोर विकृत चाळे केले.

२३ वर्षीय तरूणीनं न घाबरता हा प्रकार न घाबरता मोबाइलमध्ये चित्रीकरण सुरू करताच तरुणाने तेथून पळ काढला. तरुणीने हा व्हिडीओ ट्विट केल्यानंतर नवघर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच कारवाई केली. तरूणीच्या तक्रारीनंतर आणि व्हिडीओच्या आधारावर नवघर पोलिसांनी या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी व्हिडीओच्या आधारे ठाणे येथून संदीपला अटक केली. संदीप हा उच्चशिक्षित असून चांगल्या कंपनीमध्ये कामाला असल्याचे सजतेय.

First Published on May 13, 2019 9:28 am

Web Title: man sexually harasses woman inside mulund atm gets arrested