News Flash

निर्दयी! सात वर्षांच्या मुलासमोरच वडिलांनी डोकं ठेचून केला आईचा खून

विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरुन हे कृत्य केल्याचं समोर येत आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

एका ४२ वर्षीय व्यक्तीने २६ किलोच्या दगडाने डोकं ठेचून आपल्या पत्नीची हत्या केल्याचा मुंबईतला धक्कादायक प्रकार समोर येत आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे. फ्री प्रेस जर्नलने आपल्या वेबसाईटवरुन हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

या प्रकरणातल्या आरोपीचं नाव संतोष यादव असल्याचं कळत आहे. हा खून करुन तो उत्तर प्रदेशातल्या आपल्या गावी निघाला होता. तेव्हा त्याला पोलिसांनी रेल्वे स्थानकावरच गाठून अटक केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, या दाम्पत्यामध्ये कायम वाद, भांडणं होत असत. संतोषला आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. काल त्यांच्यातला वाद टोकाला गेला आणि संतोषने आपल्या बायकोचं डोकं दगडाने ठेचून तिथून पळ काढला. ही सगळी घटना या दोघांच्या सात वर्षांच्या मुलाच्या डोळ्यांसमोर घडत होती. त्याचे वडील तिथून पळून गेल्यानंतर त्या मुलाने रस्त्यावरच्या लोकांना बोलावलं आणि मग त्यापैकीच एकाने पोलिसांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर भायखळा पोलीस त्वरीत घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या महिलेला रुग्णालयात हलवलं. मात्र, जखमांची तीव्रता अधिक असल्याने ती वाचू शकली नाही.

“आम्ही खुनाचा गुन्हा दाखल केला आणि सदर व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. आरोपी त्याच्या गावी पळून गेला असल्याची शंका आम्हाला आली. त्यामुळे आम्ही रेल्वे स्थानकाच्या परिसरात साध्या वेशातले पोलीस तैनात केले आणि जेव्हा त्या दिवशी संध्याकाळी तो रेल्वेमध्ये चढण्यासाठी स्थानकावर आला तेव्हा आम्ही त्याला अटक केली”, असं भायखळा पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर अशोख खोत यांनी सांगितलं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 6:24 pm

Web Title: man smashed head of his wife in front of his seven years old son suspecting her affair vsk 98
Next Stories
1 अरुण गवळीची दगडी चाळ होणार इतिहासजमा; म्हाडा उभारणार ४० मजली टॉवर
2 “P-305 दुर्घटना मानवनिर्मितच, मोदी सरकार चुकांमधून कधी शिकणार?” काँग्रेसचा गंभीर आरोप!
3 विरार : करोना केंद्रातून पळालेल्या करोनाबाधिताचा आढळला मृतदेह!
Just Now!
X