News Flash

२०००ची बनावट नोट देऊन बिअर खरेदी करणे पडले महागात, युवक अटकेत

चिखलेबरोबर आणखी कोणी आहे का याचा शोध घेतला जात आहे.

जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर वडगाव-तळेगाव फाट्याजवळ पोलिसांनी शनिवारी मोटारीतून नेण्यात येणार १६ लाख रूपयांची रोकड पकडली. (संग्रहित छायाचित्र)

बनावट नोटांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या व २००० रूपयांच्या नव्या नोटा व्यवहारात आणल्या. परंतु २००० रूपयांच्या बनावट नोटाही आता बाजारात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच अंधेरी येथील एका वाईनशॉपमध्ये दोन हजार रूपयांची बनावट नोट देऊन मद्य खरेदी केल्याचा प्रकार घडला. ही घटना ताजी असतानाच विरार (पश्चिम) येथील एका वाईनशॉपमध्ये असाच प्रयत्न करणाऱ्या एका युवकाला महागात पडला. दुकानदाराने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तुषार चिखले (वय २६, रा. विरार पूर्व) असे या युवकाचे नाव असून तो २००० रूपयांची बनावट नोट देऊन बिअर खरेदी करत होता.
रविवारी (दि. २६) सांयकाळी चिखले हा विरार (पश्चिम) येथील एका वाईनशॉपमध्ये बिअर खरेदी करण्यासाठी गेला होता. त्याने यासाठी दुकानदाराला २००० रूपयांच्या नव्या नोटेची कलर झेरॉक्स प्रत दिली. परंतु वाईनशॉपचे मालक विश्वनाथ शेट्टी यांना लगेचच ही नोट बनावट असल्याची लक्षात आले. चिखले तेथून पळून जाण्यापूर्वीच त्यांनी त्याला पकडले.
चिखलेकडून मोठ्याप्रमाणात बनावट नोटा जप्त करण्यात आले असून २००० रूपयांच्या नोटेची अचूक झेरॉक्स काढण्यासाठी त्याने किमान ४ ते ५ प्रिंट काढली असण्याची शक्यता विरार पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी चिखलेला मंगळवारी न्यायालयासमोर उभे केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चिखलेबरोबर आणखी कोणी साथीदार आहेत का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्याचबरोबर चिखलेने या नोटांची झेरॉक्स कॉपी कुठे काढली याचाही शोध घेण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 8:48 pm

Web Title: man uses fake rs 2000 note to buy beer
Next Stories
1 पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हत्येचा गुन्हा दाखल करा: काँग्रेस
2 मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कल्याण लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड
3 लोकांचा त्रास कमी झाला तर बाळासाहेबांना आनंद; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला
Just Now!
X