News Flash

कोविशिल्डच्या पहिल्या मात्रेनंतर ८४ दिवस पूर्ण करणे बंधनकारक

दुसऱ्या मात्रेसाठी वेळ आरक्षित केलेल्यांना लस देण्याचे आदेश

दुसऱ्या मात्रेसाठी वेळ आरक्षित केलेल्यांना लस देण्याचे आदेश

मुंबई : कोविशिल्डच्या दुसऱ्या मात्रेच्या कालवधीच्या मुदतीमध्ये बदल करण्यापूर्वी वेळ आरक्षित केलेल्या लाभार्थ्यांना परत न पाठविता लस द्यावी, असे आदेश केंद्रीय आरोग्य विभागाने राज्यांना दिले आहेत.

कोविशिल्डच्या दुसऱ्या मात्रेच्या कालावधीची मुदत केंद्रीय आरोग्य विभागाने सहा आठवडय़ांवरून १२ ते १६ आठवडय़ांपर्यत वाढविली आहे. त्यामुळे आता पहिली मात्रा घेतल्यापासून ८४ दिवसांपेक्षा कमी काळात कोणत्याही लाभार्थ्यांला दुसरी मात्रा घेता येणार नाही. तसेच ८४ दिवसांच्या आधी वेळ आरक्षित करण्याची सुविधाही कोविन मध्ये दिली जाणार नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी अनेक लाभार्थ्यांनी दुसऱ्या मात्रेसाठी वेळ आरक्षित केली आहे. हे लाभार्थी दुसरी मात्रा घेण्यासाठी पात्र असतील. यांच्या वेळा कोविन संकेतस्थळातून रद्द केल्या जाणार नाहीत. यांचे लसीकरण करण्याची सुविधा अ‍ॅपमध्येही उपलब्ध असेल. दुसरी मात्रा उशीरा घेणे का फायद्याचे आहे याबाबत माहिती देऊन ८४ दिवसांनंतरची वेळ घेण्याचा सल्ला केंद्रावरील डॉक्टरांनी या लाभार्थ्यांना द्यावा. मात्र तरीही लाभार्थ्यांंनी लस घेण्यासाठी आग्रह केल्यास लस न देता परत पाठवू नये असे अशा सूचना आरोग्य विभागाने राज्यांना दिल्या आहेत.

पहिल्या मात्रेपासून ८४ दिवसांच्या आत दुसऱ्या मात्रेसाठी वेळ आरक्षित केलेल्या लाभार्थ्यांना ८४ दिवसांनंतर वेळ आरक्षित करता येईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 2:29 am

Web Title: mandatory to complete 84 days for second dose of covishield zws 70
Next Stories
1 मराठा आरक्षणप्रकरणी भाजपचे राजकारण
2 राज्यातील ११८ गृहप्रकल्पांतील विकासक बदलले!
3 ‘कोविन’अडचणीचे,मुबईकरांसाठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करा
Just Now!
X