15 July 2020

News Flash

सॅनिटायझरची विक्री औषध दुकानांमध्येच करणे बंधनकारक

नवीन सूचना प्रशासनाने जाहीर केल्याचे औषध प्रशासनाचे सहआयुक्त जे. बी. मंत्री यांनी सांगितले.

संग्रहित छायाचित्र

मुंबई : ज्या उत्पादकांना हॅण्ड सॅनिटायझर उत्पादनाचा परवाना औषधअंतर्गत दिलेला आहे, अशा सॅनिटायझरची विक्री औषध दुकानांमध्येच करणे बंधनकारक असेल असे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

करोना साथीच्या उद्रेकामध्ये हॅण्ड सॅनिटायझरच्या उत्पादनांचा तुटवडा निर्माण झाल्याने मोठय़ा प्रमाणात याची निर्मिती करण्यासाठी प्रशासनाने अलोपॅथी उत्पादकांना नमुना २५ अंतर्गत औषध म्हणून तर आयुर्वेदिक आणि सौंदर्यप्रसाधने उत्पादकांना हॅण्ड सॅनिटायझर किंवा हॅण्ड क्लिनिंग याअंतर्गत परवाना दिलेला आहे. परंतु काही साखर कारखान्यांमध्ये याचे उत्पादन करून रस्त्यावरही विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. तर काही काही कंपन्यांकडे दोन्ही प्रकारचे परवाने असल्याने यांच्या विक्रीवर कोणतेही निर्बंध न राहिल्याचेही समोर आले. त्यामुळे नवीन सूचना प्रशासनाने जाहीर केल्याचे औषध प्रशासनाचे सहआयुक्त जे. बी. मंत्री यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 3:26 am

Web Title: mandatory to sell sanitizers only in drug stores zws 70
Next Stories
1 राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत चर्चा
2 ‘करोनापश्चात ग्राहक आणि ग्राहक चळवळ’ या विषयावर वेबिनार
3 नवी मुंबईत दिवसभरात करोनाचे ११४ रुग्ण, शहरातील रुग्णांची संख्या २ हजाराच्या पार
Just Now!
X