माजी मंत्री एकनाथ खडसे आणि दाऊद इब्राहिमची पत्नी यांच्यात अनेकदा मोबाइलवरून संभाषण झाल्याचा आरोप करत खळबळ उडवून देणारा तथाकथित हॅकर मनीष भंगाळे याला शुRवारी मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला ६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत धाडले आहे.

ज्या नोंदी किंवा कागदपत्रे दाखवून भंगाळे आरोप करत होता ती बनावट असल्याचे आमच्या चौकशीतबी स्पष्ट झाले.  त्यानंतर वांद्रे कुर्ला संकुल येथील सायबर पोलिसांनी भंगाळेला ठाण्यातून ताब्यात घेत अटक केली, अशी माहिती सह आयुक्त्(गुन्हे) संजय सक्सेना यांनी लोकसत्ताला दिली. खोटय़ा, बनावट कागद पत्रां आधारे आरोप करण्यामागील हेतू काय, हे जाणून घेण्यासाठी त्याची चौकशी सुरु असल्याचे सक्सेना सांगतात.

आम आदमी पक्षाच्या नेत्यांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भंगाळेने पकिस्तान टेलीफोन कंपनी सोबत भारतातील मोबाईल कंपनीची वेबसाइट हॅक करून खडसे आणि दाऊदची पत्नी यांच्यात फोनाफोनी झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर गुन्हे शाखेसह राज्य दहशतवाद विरोधी पथकानेही तातडीने चौकशी केली आणि भंगाळेचा दावा चुकीचा ठरवला होता. यानंतर गुन्हे शाखेने या प्रकरणाची सायबर पोलीस ठाण्या करवी सखोल चौकशी करण्यात आली. एका वरीष्ठ अधिकारम्य़ाने लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार भंगाळेने कोणतीही वेब साईट हॅक केल्याचे चौकशीत समोर आलेले नाही. तो मुळात हॅकर आहे का हे आता तपासून पाहिले जाईल.

दरम्यान आप च्या नेत्या प्रीति मेनन शुRवारी पोलीस ठाण्यात होत्या. भंगाळेने केलेले आरोप गंभीर असून त्याची चौकशी व्हावी हीच पक्षाची अपेक्षा होती. मात्र राज्य सरकार आणि गुन्हे शाखेने चौकाशीचा फार्स केला, असा आरोप त्यांनी केला.