राज्याच्या प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी मनीषा आणि मिलिंद म्हैसकर यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद परतला आहे. सरोगसीच्या माध्यमातून मनीषा आणि मिलिंद म्हैसकर यांच्या घरात जुळया मुलींचा जन्म झाला आहे. वर्षभरापूर्वी मनीषा आणि मिलिंद म्हैसकर यांचा एकुलता एक मुलगा मन्मथने आत्महत्या केल्याने त्यांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली होती.

सर्वार्थानं जोडीदार: मनीषा व मिलिंद म्हैसकर यांच्या सहजीवनाची हकीकत त्यांच्याच शब्दांमध्ये

Loksatta chavdi happening in Maharashtra politics news on Maharashtra political crisis
चावडी: नाना अन् तात्याचे पारावर उपोषण!
Mukhtar Ansari death
कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीच्या तुरुंगात मृत्यूनंतर न्यायालयीन चौकशीचे आदेश
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”
Nandurbar district bus conductors murder solved son-in-law killed father-in-law due to a family dispute
सासऱ्यासाठी जावईच काळ, नंदुरबार जिल्ह्यातील बस वाहकाच्या हत्येची उकल

सध्या या  मुली रुग्णालयात असून शुक्रवारपर्यंत त्यांना  घरी घेऊन जाता येईल. मुलींच्या जन्माने आमच्या आयुष्यात चमत्कार झाला आहे असे मनीषा यांनी सांगितले. ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात मुंबईतील रुग्णालयात सरोगेट मातेच्यापोटी या जुळया मुलींचा जन्म झाला. डॉ. जतीन शहा या आयव्हीएफ तज्ञाची यासाठी मदत घेण्यात आली. म्हैसकर दांम्पत्याकडून यापेक्षा जास्त काही तपशील उपलब्ध होऊ शकलेला नाही.

Video: व्हिवा लाउंजमध्ये मनीषा म्हैसकर

मिलिंद आणि मनीषा म्हैसकर दोघेही राज्याच्या प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहे. मिलिंद (५०) हे म्हाडाचे सीईओ आहेत तर मनीषा या शहर विकास विभाग-२ च्या प्रधानसचिव आहेत. मागच्यावर्षी जुलै महिन्यात या दांम्पत्याचा एकुलता एक मुलगा मन्मथने आत्महत्या करुन जीवन संपवले. मुलाच्या मृत्यूनंतर मिलिंद म्हैसकर यांनी एका वर्तमानपत्रात लेख लिहून मुलासोबतचे नातेही उलगडले होते.

डिसेंबर २०१७ मध्ये या दांम्पत्याने पुन्हा आई-वडिल बनण्याचा निर्णय घेतला. आयव्हीएफ आणि सरोगसीच्या त्यांच्या निर्णयाबद्दल फक्त काही जवळच्या माणसांना माहिती होते. मुलींच्या जन्मापर्यंत म्हैसकर दांम्पत्याने परवडणाऱ्या घरांसह स्वच्छ भारत अभियानासारखे महत्वाचे प्रकल्प हाताळले. मनीषा म्हैसकर सध्या सुट्टीवर आहेत. देवाचा आशिर्वाद आणि कठिण काळात जे लोक आमच्यासोबत होते त्यांच्या सदिच्छांमुळे आमच्या आयुष्यात आज हा दिवस आला आहे असे मनीषा यांनी सांगितले.