News Flash

शुभेच्छांसाठी ‘सर’ मातोश्रीवर

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील अपमान गिळून वडीलकीच्या नात्याची बूज ठेवून शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी रविवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन

| November 4, 2013 03:31 am

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील अपमान गिळून वडीलकीच्या नात्याची बूज ठेवून शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी रविवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीत कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही, असे मनोहर जोशी यांनी या भेटीनंतर स्पष्ट केले.
दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या मनोहर जोशी यांना अप्रत्यक्षपणे उमेदवारी नाकारण्यात आली, तसेच त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला पक्षबांधणीपासूनही दूर ठेवण्यात आल्यानंतर सरांनी पक्षनेतृत्वावर टीका केली. दसरा मेळाव्यात याचे पडसाद उमटून शिवसैनिकांनी सरांच्या विरोधात केलेली घोषणाबाजी आणि व्यासपीठावर उपस्थित असतानाही उद्धव यांचे थंड बसणे यामुळे सरांना व्यासपीठावरून पायउतार व्हावे लागले होते.
अपमानाचे हे घोट गिळून जोशीसर पुन्हा जोराने कामाला लागले असून आपले ज्येष्ठत्व जपत उद्धव यांना रविवारी मातोश्रीवर जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. याबाबत विचारले असता कोणतीही राजकीय चर्चा या भेटीत झाली नाही. मात्र पुन्हा लवकरच भेटण्याचे ठरले असे मनोहर जोशी यांनी
सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2013 3:31 am

Web Title: manohar joshi meet uddhav thackeray
टॅग : Manohar Joshi
Next Stories
1 राज्यातील शिक्षकांची ‘काळी दिवाळी’
2 ठाण्यात लेनसेस कंपनीला आग
3 विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू
Just Now!
X