News Flash

मनोज एबिटवार आणि निलेश शिंदे ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते

अग्रलेखावर मत मांडणाऱ्या मनोज आणि नीलेश यांनी दर्जेदार लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली.

मनोज एबिटवार आणि निलेश शिंदे ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते

अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदाचे बोलले. छोटय़ामोठय़ा कलाकाराच्या वाढदिवशी शुभेच्छा ट्वीट करणारे, मोठय़ा देशांच्या प्रमुखांना स्वत:च बिलगणारे, मन की बात साऱ्या जगाला सांगणारे असे आपले बहुबोलके पंतप्रधान गोप्रेमींच्या हिंस्र धुडगुसावर सातत्याने मौन बाळगत होते. ते मौन त्यांनी आज अखेर सोडले आणि त्यांनी गोरक्षकांना का खडसावले. यामुळे आता पुढच्या परदेश दौऱ्यात कोणी समजा त्यांना विचारलेच की तुमच्या देशात गोरक्षणावरून इतका हिंसाचार सुरू आहे अािण तुम्हीच काहीच कसे करीत नाही तर आपले पंतप्रधान या खडसावण्याचा दाखला देत ताठ मानेने म्हणू शकतील मी नाही त्यातला असे मत मांडणाऱ्या ‘मी नाही त्यातला!’ या अग्रलेखावर आपली भूमिका मांडत नांदेड जिल्हय़ातील उस्माननगर येथील समता कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी मनोज एबिटवार हा ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेत नीलेश शिंदे याने दुसरे पारितोषिक पटकावले.

अग्रलेखावर मत मांडणाऱ्या मनोज आणि नीलेश यांनी दर्जेदार लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. मनोजला सात हजार आणि प्रमाणपत्र तर नीलेशला पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. या अग्रलेखावर व्यक्त होताना राज्यभरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना चालना देत उत्तम लेखन केले.

महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहेत. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना www.loksatta.com/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2017 5:21 am

Web Title: manoj abitvar and nilesh shinde loksatta blog benchers winners
Next Stories
1 निकालाच्या नादात अध्यापनाला दांडी!
2 उत्तरपत्रिका तपासणीत गैरप्रकार?
3 एका निवृत्त अधिकाऱ्याची तीन पदांवर वर्णी!
Just Now!
X