उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. मुंब्रा रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्यांनी कळवा खाडीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली असल्याची माहिती दिली होती. दरम्यान मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली असून ते आत्महत्या करणं शक्य नसल्याचं सांगत पोलिसांनी चुकीची माहिती देऊ नये अशी विनंती केली आहे. यावेळी त्यांनी कांदिवली क्राइम ब्रांचमधील तावडे नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला आहे

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या गाडीच्या मालकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
“क्रॉफर्ड मार्केटमध्ये भेट झालेली ‘ती’ व्यक्ती कोण?,” अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणी फडणवीसांचे गंभीर आरोप

“मी आणि माझं कुटुंब असा विचारही करु शकत नव्हतं. आमची गाडी आठ दिवसांपूर्वी चोरी गेली होती. पोलीस जेव्हा कधी फोन करायचे माझे पती चौकशीसाठी जात होते. पोलीस तासनतास त्यांना बसवून ठेवायचे. कालही त्यांना बोलावलं होतं, ते गेले होते पण परत आले नाही. १० वाजल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. कांदिवली क्राइम ब्रांचमधून तावडे म्हणून कोणाचा तरी फोन आला होता. ते गेल्यानंतर अर्ध्या तासात फोन बंद झाला. आम्ही रात्रभर वाट पाहिली. सकाळीपण काही पत्ता नसल्याने तक्रार दिली,” असं विमल हिरेन यांनी सांगितलं आहे.

अंबानी प्रकरण: फडणवीसांच्या गंभीर आरोपांवर सचिन वाझे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

दरम्यान यावेळी त्यांनी पोलीस आत्महत्या केली असल्याचं सांगत आहेत त्यावरुन नाराजी व्यक्त केली. “पोलीस त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगत आहे. ते कधीच आत्महत्येचा विचार करु शकत नाहीत. त्यांच्याबद्दल ही अफवा पसरवली जात असून खूप चुकीचं आहे. याचा पूर्ण तपास झाला पाहिजे. आमच्या कुटुंबाला याचा खूप त्रास होत आहे”.

अंबानी प्रकरण: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडे; अनिल देशमुखांची माहिती

ते कधीच आत्महत्या करु शकत नाही सांगताना विमल हिरेन यांनी पोलिसांवर कोणताही संशय नसल्याचं स्पष्ट केलं. “शेवटचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी आपल्याला कांदिवली क्राइम ब्रांचमधून फोन आला असून घोडबंदरला भेटण्यासाठी बोलावलं असल्याचं सांगितलं होतं,” अशी माहिती विमल हिरेन यांनी दिली.

एटीएस करणार तपास
“मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं सापडल्या प्रकरणात गाडी ज्यांच्या ताब्यात होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. या प्रकरणाच्या तपासासंबंधी विरोधकांकडून वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल. आम्ही हा तपास एटीएसकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.