दादर- माटुंगा दरम्यान रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्याने तब्बल साडे तीन तास मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत होती. पण प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं. या आंदोलनाची झळ पोलिसांनाही बसली. या सगळ्या गदारोळात आंदोलकांनी पोलिसांवर आणि रेल्वे गाड्यांवर दगडफेकही केली. या दगडफेकीत अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले.

Arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांची तुरुंगात इन्सुलिन देण्याची मागणी, न्यायालयात याचिका दाखल
D Y Chandrachud News in Marathi
‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न’; २१ निवृत्त न्यायाधीशांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहित व्यक्त केली चिंता
in Nagpur, Attempted Gang Rape, Raises Concerns, Women Safety, Attempted Gang Rapein Nagpur, crime in nagpur, nagpur crime, police, nagpur news, marathi news,
गृहमंत्र्यांच्या गृहशहरात महिला असुरक्षित? भरदुपारी गँगरेपचा प्रयत्न
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा

यातील काहींच्या जखमा या गंभीर असल्यामुळे त्यांना सायन रुग्णालयात पाठवण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बोबडे, पोलीस निरीक्षकसह साटव, पोलीस उपनिरीक्षक माने, महिला पोलिस कॉन्स्टेबल सानप, महिला पोलिस कॉन्स्टेबल परुळकर हे या दगडफेकीत जखमी झाले. रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) सतेंद्र कुमार, मनोज यादव, धमेंद्र कुमार, जसवीर राणा, प्रकाश लांडगे, सचीन मोर या पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

रेल रोकोचे वृत्त समजताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थी आक्रमक झाले आणि त्यांनी रेल्वे रुळावरुन हटण्यास नकार दिला. पोलिसांनी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याने विद्यार्थी आणखी आक्रमक झाले आणि त्यांनी दगडफेक केली. विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यात काही विद्यार्थी जखमी झाले. सकाळी दहाच्या सुमारास रेल्वेच्या वतीने एक टीम आंदोलनस्थळी पोहोचली. रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली.