News Flash

मान्यता दत्त रुग्णालयात

संजय दत्तची पत्नी मान्यताला उपचारासाठी ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर अजय चौगुले यांनी दिली आहे.

| January 9, 2014 02:02 am

संजय दत्तची पत्नी मान्यताला उपचारासाठी ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर अजय चौगुले यांनी दिली आहे. तिचा नेमका आजार काय आणि पुढचे उपचार कशाप्रकारे करण्यात येणार आहेत, याविषयीचे तपशील आताच देता येणार नाहीत, असे चौगुले यांनी म्हटले आहे. गेल्या महिन्यात मान्यताला यकृतात गाठ असल्याचे निदान झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, सध्या तिच्या विविध चाचण्या सुरू आहेत. तिची प्रकृती आता कशी आहे, याबद्दल आताच काही सांगता येणार नसल्याचे चौगुले म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 2:02 am

Web Title: manyata dutt admitted to the hospital
Next Stories
1 मुंबईतल्या नर्तिकेवर सामूहिक बलात्कार
2 जिल्ह्यंनाही लवकरच विमानसेवा
3 एसटीचा ‘भार’ आता देवावर!
Just Now!
X