News Flash

आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचे मुंबईत आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी आहे.

मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे लालबागसह मुंबईत काही ठिकाणी रविवारी आंदोलन करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे मराठा समाज रस्त्यावर उतरला असून मुंबईत रविवारी शहर व उपनगरांमध्ये २० ठिकाणी आंदोलने झाली.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने त्वरित पावले उचलावीत, जोपर्यंत स्थगिती उठविली जात नाही आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कुठलीही सरकारी भरती होऊ देणार नाही, अशा आमच्या मागण्या असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजन घाग यांनी सांगितले. मराठा समाजाचे आजचे आंदोलन शांततेत पार पडले, पण आरक्षण मिळाले नाही, तर समाजाचा उद्रेक होईल व त्याला सरकार जबाबदार असेल, असे घाग यांनी स्पष्ट केले.

लालबागमध्ये राजन घाग,राजा विचारे, अभिजित घाग, सचिन मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. या वेळी मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

करोनामुळे सामाजिक अंतराचे सर्व नियम पाळून आंदोलनात सहभागी झालेल्यांना मुखपट्टय़ा व सॅनिटायझर देण्यात आले होते. मराठा क्रांती मोर्चातर्फे स्थानिक आमदार अजय चौधरी व कालिदास कोळंबकर यांना मराठा समाजाच्या मागण्यांचा विधानसभेत पाठपुरावा करण्यासाठी निवेदन देण्यात आले, असे घाग यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 2:11 am

Web Title: maratha kranti morcha agitation in mumbai for reservation zws 70
Next Stories
1 Coronavirus : चार लाख मुंबईकर गृहविलगीकरणात
2 शासकीय कार्यालयांतील १०० टक्के उपस्थितीविरोधात आज आंदोलन
3 धरणांमध्ये ८२ टक्के पाणीसाठा
Just Now!
X