News Flash

Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षण : मराठा क्रांती मोर्चाचा आज राज्यभर ‘जेलभरो’

Maratha Kranti Morcha : मुंबईतील आझाद मैदानातून सकाळी 11 वाजता या आंदोलनाला सुरुवात होत आहे

Maratha Kranti Morcha : (संग्रहित छायाचित्र)

Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समजाच्यावतीने आज राज्यभरात जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईतील आझाद मैदानातून सकाळी 11 वाजता या आंदोलनाला सुरुवात होत आहे. या आंदोलनासाठी सकल मराठा समाजाकडून काही मागण्या प्रामुख्याने समोर ठेवण्यात आल्या आहेत. मराठा समाजाच्या वतीने चालू असलेल्या आंदोलनाची पुढील दिशा म्हणून 1 ऑगस्टला जेल भरो आंदोलन होणार असल्याचे सकल मराठा समाजाच्यावतीने सांगण्यात आले.

मुंबई बंदच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडून मुंबईसह ठाणे व इतर ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या, लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटल यांनी मराठा समाजाची माफी मागावी, समाजासाठी ज्यांनी प्राण गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकी 50 लाख रुपये व जखमींना 10 लाख रुपये देण्यात यावेत. कळंबोली येथे महिला वर केलेल्या बेछुट लाठीचार्ज आणि गोळीबार संदर्भात सदर अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, व त्यांना त्वरीत निलंबित करावे. अशा मागण्या आहेत

दरम्यान, आपल्या मागण्या घेऊन मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 1 ऑगस्ट 2018 पासून जेल भरो आंदोलन सुरू होईल, असे सकल मराठा समाजाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2018 9:02 am

Web Title: maratha reservation jail bharo by maratha kranti morcha in maharashtra
Next Stories
1 महापालिका निवडणूक : दोन तासांत जळगावात ५ टक्के तर, सांगलीत १० टक्के मतदान
2 प्रत्येक गावात विद्युतीकरणाचे लक्ष्य गाठण्यात अपयश!
3 ‘गोकुळ’ची दूध दरवाढ
Just Now!
X