आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाची पुढची नेमकी दिशा काय असावी हे निश्चित करण्यासाठी आज मराठा आरक्षण परिषदेने पुण्यात महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी मराठा समाजातील मान्यवर समन्वयक, संशोधक, तज्ञ, अभ्यासक तसेच खासदार उदयनराजे भोसले देखील उपस्थित राहणार आहेत.

तर, दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीवर विचारमंथन करण्यासाठी राज्यातही विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतही घाटकोपरच्या शिवाजी महाराज मैदानात बैठकीचं आयोजन आहे. 9 ऑगस्टला नियोजित असलेल्या आंदोलनाबाबत नियोजन करण्यासाठी मुंबईत मराठा संघटनांची बैठक होणार आहे.

bjp rajput voters in up
उत्तर प्रदेशमध्ये भाजपा अडचणीत! तिकीट वाटपावरून राजपूत समुदाय पक्षावर नाराज
chhatrapati sambhajinagar, Chandrakant Khaire, Imtiaz Jaleel, Eid, lok sabha election 2024
औरंगाबादमध्ये मुस्लीमबहुल भागातही शिवसेनेचा राबता वाढला, खैरे आणि इम्तियाज जलील यांची गळाभेट
maharashtra lokrang article, maharashtra lokrang
प्रगल्भ महाराष्ट्राच्या आठवणी
MP Navneet Rana
…तरीही नवनीत राणा खासदार, पण रश्मी बर्वे मात्र बाद

पुण्यात आज दुपारी १ ते ४ या दरम्यान बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मराठा समाजाची आंदोलनाची पुढची दिशा काय असेल याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाजाचं आंदोलन सुरूच आहे. आज धुळ्यात खासदार सुभाष भामरे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. तर, पालघरमध्येही धरणे आंदोलन होणार आहे.दुसरीकडे परळीत सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज १९ वा दिवस आहे.