19 January 2021

News Flash

नांदेडमध्ये मराठा आंदोलन चिघळले, दगडफेकीत १३ पोलीस जखमी

मराठा आरक्षण आंदोलनाची आग अजूनही क्षमलेली नसून राज्याच्या वेगवेगळया भागात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलने, मोर्चे सुरुच आहेत.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

मराठा आरक्षण आंदोलनाची आग अजूनही क्षमलेली नसून राज्याच्या वेगवेगळया भागात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलने, मोर्चे सुरुच आहेत. शुक्रवारी नांदेड जिल्ह्यातील आमदुरा येथे मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावेळी आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत १३ पोलीस जखमी झाले.

आमदुरा येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन करण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी वाटेत अडवले. त्यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. लगेचच या घटनेचे शेजारच्या पुणे गावात पडसाद उमटले. संतप्त आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. अश्रूधुराच्या नळकांडया फोडाव्या लागल्या. यावेळी झालेल्या दगडफेकीत १३ पोलीस जखमी झाले.

अमदुरामध्ये काही तरुणांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गोदावरी नदीत जलसमाधी आंदोलन करण्याची घोषणा केली. सकाळी अकराच्या सुमारास काही तरुण नदीच्या दिशेने चाललेले असताना पोलिसांनी त्यांना वाटेत अडवले. त्यावेळी दोन्ही बाजूंकडून सुरुवातीला शाब्दीक वादावादी झाली.

पोलीस आंदोलकांना पुढे जाऊ देत नव्हते त्यावरुन वाद वाढत गेला आणि अचानक दगडफेक सुरु झाली. संतप्त झालेल्या जमावाला आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला तसेच अश्रूधुराच्या नळकांडया फोडाव्या लागल्या. संतप्त जमावाने पोलिसांच्या चार गाडयांची तोडफोड केली व तिथे असलेल्या दुचाकींचेही नुकसान केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2018 8:06 pm

Web Title: maratha reservation protest in nanded turn violent
Next Stories
1 बडया नेत्यांनी रचला होता वारीमध्ये घातपाताचा कट! महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट
2 Lunar Eclipse : चंद्रग्रहणावेळी मुंबईत ढगाळ वातावरण?
3 अलिबागमध्ये गोमांस विकणाऱ्या तिघांना अटक
Just Now!
X