News Flash

अभिनेते गिरीश साळवी यांचं निधन

बुद्धिबळ आणि झब्बू या नाटकातला त्यांचा अभिनय कायम स्मरणात राहिल

अभिनेते गिरीश साळवी यांचं निधन झालं आहे. अभिनेते आणि लेखक राजेश देशपांडे यांनी फेसबुक पोस्ट करुन या संदर्भातली माहिती दिली आहे. दीर्घ आजाराने गिरीश साळवी यांचं निधन झालं असल्याची माहिती राजेश देशपांडे यांनी पोस्ट केली आहे.

 

बुद्धिबळ आणि झब्बू, ७४ पावसाळ्यांचा खर्च ही त्यांची नाटकं रंगभूमीवर गाजली होती. धुडगूस या सिनेमाची त्यांनी निर्मितीही केली होती. एक प्रयोगशील अभिनेता, एक चांगला दिग्दर्शक आणि निर्माता अशी ओळख असलेले गिरीश साळवी यांचं निधन झालं आहे.

गिरीश साळवी यांचं वरळी येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे. चं.प्र देशपांडे यांच्या बुद्धिबळ झब्बू या नाटकात त्यांच्या अभिनयाची जादू पाहण्यास मिळाली होती. तसंच विजय तेंडुलकर लिखित चौऱ्याहत्तर पावसळ्यांचा जमाखर्च या दीर्घांकातलाही त्यांचा अभिनय सर्वांगसुंदर होता. सहज साधा वावर, स्पष्ट उच्चार, टायमिंग आणि नाटकांच्या लयीचे उत्तम भान हे त्यांच्या अभिनयाचे विशेष होते.

७२ पावसाळ्यांचा जमाखर्च हा दीर्घांक, बुद्धिबळ आणि झब्बू, इंदू काळे सरला भोळे, खेळीमेळी, दावेदार ही त्यांची नाटकं आणि त्यातला त्यांचा अभिनय आजही रसिकांच्या स्मरणात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 10:12 pm

Web Title: marathi actor girish salvi passes away scj 81
Next Stories
1 करोनावरील उपचारांसाठी अशोक चव्हाण यांना लिलावती रुग्णालयात केलं दाखल
2 …अन्यथा मुंबईवरील करोना संकट बनेल भयावह!
3 सिद्धिविनायकाचा पुन्हा रक्तदान महायज्ञ!
Just Now!
X