News Flash

प्रियदर्शन जाधव, सविता मालपेकर यांसह दिग्गज कलाकारांनी हाती घेतला राष्ट्रवादीचा झेंडा

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश करण्यात आला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आरोग्यमंत्री राजेश टोपेहेदेखील उपस्थित होते.

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, माया जाधव, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रियदर्शन जाधव, लेखक कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक संतोष भांगरे, अभिनेते गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे, निर्माता शाम राऊत, अभिनेते डॉ. सुधीर निकम, उमेश बोळके, मोहित नारायणगावकर आदींसह इतर सहकलाकारांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.

दरम्यान, राजेश टोपे यांनी पक्षप्रवेशासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसंच अनेक नामवंतांनी राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलमध्ये प्रवेश केल्याने पक्षाचा सांस्कृतिक विभाग अधिक सशक्त झाला असल्याचीही भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 2:09 pm

Web Title: marathi film industry actors joins ncp deputy cm ajit pawar jud 87
Next Stories
1 विलगीकरणासाठी घेतलेल्या घरांच्या कर्जाचे हप्ते सरकारने भरावे
2 मुंबई विद्यापीठाने २०१९-२० अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत काढले परिपत्रक
3 ‘सबका टाइम आयेगा’, कंगना रणौतच्या कार्यालयावरील कारवाईनंतर नितेश राणेंचे सूचक टि्वट
Just Now!
X